महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून दमदाटी, गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून दमदाटी, गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : सोलापूर रोडवरील भिंगार परिसरातील दरेवाडी येथील एका महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसून पोपट होळकर (राहणार नेप्ती) याने तिच्याशी अरेरा

युवकांनी ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानून कार्य करावे – डॉ. आर. जे. बार्नबस
नगर तालुक्यात विद्यार्थ्यांची लसीकरणासाठी हेडसाळ मंत्र्यांचे दुर्लक्ष !
अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरवसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी : सोलापूर रोडवरील भिंगार परिसरातील दरेवाडी येथील एका महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसून पोपट होळकर (राहणार नेप्ती) याने तिच्याशी अरेरावी केल्याची घटना घडली.
याबाबत या महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचे पती ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी दोन वर्षापूर्वी पोपट होळकर याच्याकडून पंधरा लाख रुपये दीड टक्के व्याजाने घेतले होते. त्यावर सोनवणे यांनी व्याजासह 36 लाख रुपये परत केले होते, परंतु बुधवारी दिनांक 29 रोजी सकाळी साडेआठ वाजता पोपट होळकर (पूर्ण नाव माहिती नाही, राहणार नगर) हा त्यांच्या घरी गेला. त्यावेळी ज्ञानेश्‍वर सोनवणे हे घरी कुटुंबासह घरात असताना होळकर यांनी नंदिनी सोनवणे यांना म्हटले की, तुझ्या नवर्‍याने घेतलेले पैसे परत कर, असे म्हणून दमदाटी केली व तिथून निघून गेला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नंदिनी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कायदा कलम 452 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे. दरम्यान, सावकारी प्रकरणी ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे होळकर याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. सोनवणे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर होणार्‍या तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS