सीपीआरच्या नूतन अधिष्ठाता पदी डॉ. प्रदीप दीक्षित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीपीआरच्या नूतन अधिष्ठाता पदी डॉ. प्रदीप दीक्षित

कोल्हापूर / प्रतिनिधी : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रदीप दीक्षित यांच्

रुग्णांची जगण्याची उमेद वाढवणाऱ्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून सुधा मूर्ती यांचा गौरव
जत तालुक्यात तरूणाची दगडाने ठेचून हत्या
बारावीचा निकाल आज लागणार

कोल्हापूर / प्रतिनिधी : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या सोपवण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे न्यायवैद्यकशास्त्र विभागातील प्राध्यापक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या नियुक्तीच्या आदेशाचे परीपत्रक प्रसिध्द केले आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांची या आदेशावर स्वाक्षरी आहे.
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर संस्थेचे दैनंदीन अधिष्ठाता या पदाचा अतिरीक्त कार्यभार डॉ. एस. एस. मोरे, प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड यांच्याकडे सोपविण्यात आला होता. प्राध्यापक पदाच्या एकत्रित सेवाज्येष्ठता यादीनुसार अधिष्ठाता या संवर्गात पदोन्नतीसाठी विचारक्षेत्रात समाविष्ठ असलेल्या अध्यापकांना अधिष्ठाता पदाचा अतिरीक्त कार्यभार दिल्यास त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव येण्याच्या दृष्टीने अशा प्राध्यापकांना अधिष्ठाता पदाचा अतिरीक्त कार्यभार देण्याची बाब विचाराधीन होती. त्यामुळे डॉ. प्रदिप दिक्षित, प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांची राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र या रिक्त पदावर प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेतील अधिष्ठाता पदाचा अतिरीक्त कार्यभार शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे.
डॉ. एस. एस. मोरे, प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड यांनी डॉ. प्रदिप दिक्षित, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा पदभार तात्काळ सुपुर्द करावा. डॉ. प्रदिप दिक्षित, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्ये व जबाबदार्‍या सांभाळून अधिष्ठाता पदाचा अतिरीक्त कार्यभार सांभाळावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS