Homeताज्या बातम्यादेश

केजरीवालांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी

न्यायालयात मांडली स्वतःची बाजू

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून, गुरूवारी त्यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना

वडिलांनी मारहाण केल्याने १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर
पुण्यात परप्रांतीय तरूणाची गोळ्या झाडून हत्या  
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विनम्र अभिवादन

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून, गुरूवारी त्यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी राऊस अव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांच्या ईडी कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ केली आहे. आता ते 1 एप्रिलपर्यंत कोठडीत राहणार आहेत. याआधी न्यायालयात 39 मिनिटे सुनावणी चालली. केजरीवाल यांनी स्वतः आपली बाजू मांडली. असे करणारे ते देशातील पहिले विद्यमान मुख्यमंत्री ठरले आहेत.
ईडीने न्यायालयाकडे 7 दिवसांची कोठडी मागितली होती. यावेळी त्यांच्या अटकेचा निषेध करत केजरीवाल म्हणाले की, या प्रकरणात माझे नाव फक्त चार ठिकाणी आले आहे. चार जबाब देण्यात आले आणि त्यापैकी मला गोवण्यात आलेले विधान न्यायालयासमोर मांडण्यात आले. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी ही 4 विधाने पुरेशी आहेत का? तर ईडी म्हणाले की, मुख्यमंत्री कायद्याच्या वर नाहीत. त्याचवेळी न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असताना एलजींनी तुरुंगातून सरकार चालणार नाही, असे सांगितले होते, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, हे राजकीय षडयंत्र आहे, याचे उत्तर जनता देईल.

COMMENTS