फडणवीसांचा डेटा बाँब केंद्रीय गृहसचिवांकडे ;  पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांत घोटाळ्याचे पुरावे असल्याचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांचा डेटा बाँब केंद्रीय गृहसचिवांकडे ; पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांत घोटाळ्याचे पुरावे असल्याचा दावा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपासंबंधातील पुराव्यांचा डेटा विरोदी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे सुपूर्द केला आहे.

बिपाशा बासूच्या मुलीचा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर
पंतप्रधान मोदींचा आज जिल्हाधिकार्‍यांशी संवाद ; देशातील 56 जिल्ह्यांत नगरचाही समावेश
मध्यवर्ती  प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातअपर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, नवीदिल्ली/प्रतिनिधीः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपासंबंधातील पुराव्यांचा डेटा विरोदी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे सुपूर्द केला आहे. फडणवीस यांनी फोन टॅपिंग प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देशमुख यांच्यावर केला आहे. पोलिस खात्यांमधील बदल्यासंदर्भातील घोटाळ्याचे पुरावे असतानाही कोणतीही कारवाई मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केली नाही, असा आरोप करत फडणवीस यांनी आता सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भातखळकर यांनी ट्विटरवरुन पुराव्यांसहीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण केल्यानंतरही ते निर्लज्जपणे खुर्ची उबवत बसले आहेत, अशी टीका केली. त्याचप्रमाणे भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजेच शरद पवार यांच्यावरही थेट नाव न घेता ‘त्यांचे नेते’ असा उल्लेख करत टीका केली. शंभर कोटीत प्रत्येकाचा वाटा आहे, असे भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

COMMENTS