Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस नेते, इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे निधन

नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे मंगळवारी रात्री निधन झाले

बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली भेट (Video)
मुस्लिम समाजाच्या वतीने ऐक्याचा संदेश देणारी पवित्र रमजान ईद साजरी
अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख

नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. वयाच्या 75व्या वर्षी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश आणि आकाश असा परिवार आहे. मंगळवारी रात्री ते नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

प्रकृती बरी नसल्याने छाजेड यांच्या कुटुंबियांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर नाशिकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान बुधवारी नाशिकच्या काँग्रेस भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी नाशिकच्या अमरधाममध्ये छाजेड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून जयप्रकाश छाजेड यांचा नाव लौकिक होता. नाशिकच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती. बर्‍याच काळापासून छाजेड यांचे कुटुंब काँग्रेससोबत जोडलेले होते. युवक काँग्रेसपासून छाजेड यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर जयप्रकाश छाजेड यांनी काँग्रेसच्या नाशिक शहर आणि राज्य पातळीवरील अनेक महत्त्वाची पदे भूषवली. छाजेड यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. ते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती.

COMMENTS