Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली

डिझेल अभावी टँकर बंदचबिजवडीसाठी 6 मे रोजी टँकर मंजुरीचे पत्र निघाले आहे. मात्र, डिझेलसाठी निधी उपलब्ध नाही. तसेच पेट्रोल पंपमालकांचे प्रलंबित बिल

नेमबाजीत साईराज काटेला दोन पदके
महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल
विभुतवाडी येथील भीषण अपघातात सातार्‍यातील तिघांचा मृत्यू


डिझेल अभावी टँकर बंदच
बिजवडीसाठी 6 मे रोजी टँकर मंजुरीचे पत्र निघाले आहे. मात्र, डिझेलसाठी निधी उपलब्ध नाही. तसेच पेट्रोल पंपमालकांचे प्रलंबित बिल न मिळाल्याने ते उधार डिझेल देणार नाहीत. त्यामुळे डिझेल अभावी टँकर जागेवरच उभे राहिले आहेत. गेले दोन महिने बिजवडी गाव विकतचे पाणी घेत आहे.

दहिवडी / प्रतिनिधी : शासनाने सन 2018-19 व 2020-21 या टंचाई काळात माण तालुक्यात टंचाईग्रस्त गावांना शासकीय व खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. मात्र, अनेक दिवस होऊनही टँकरचे मक्तेदार तसेच डिझेलचे पैसे शासनाने दिले नाहीत. शासनाकडून या टँकरच्या बिलापोटी 1 कोटी 74 लाख 18 हजार 115 रुपये बिल प्रलंबित आहे. त्यामुळे टँकर मक्तेदार व पेट्रोल पंपमालक थकीत बिलाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत.
माण तालुक्यात सन 2018-2019 व 2020-2021 या काळात पाणी टंचाई होती. त्यामुळे शासनामार्फत शासकीय व खासगी टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, शासनाकडे वारंवार मागणी करूनही त्या टँकर मक्तेदारांचे व पेट्रोल पंप मालकांचे अद्यापही बिले दिली नाहीत. शासनाकडून ऑक्टोंबर 2018 ते सप्टेंबर 2019 चे टँकर मक्तेदारांचे 1 कोटी 56 लाख 13 हजार 316 रुपये बिल येणे आहे. एप्रिल 2021 ते जुलै 2021 चे 18 लाख 4 हजार 799 रुपये पेट्रोल पंपमालकाने टँकरसाठी उधारीवर दिलेल्या डिझेलचे बिल प्रलंबित आहे. दोन्ही मिळून शासनाने 1 कोटी 74 लाख 18 हजार 115 रुपये बिल प्रलंबित ठेवले आहे.
यावर्षीही मार्चपासून काही गावांना पाणी टंचाई जाणवल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सन 2018-19 व 2020-21 ची टँकरची बिले शासनाने अजून दिली नाहीत. आता सुरू करण्यात आलेल्या टँकरच्या डिझेलची बिले मिळणार की डिझेलअभावी टँकर बंद होऊन टंचाईग्रस्त गावांचा पाणी पुरवठा बंद होणार, हे पाहावे लागेल.
माण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागांतर्गत टँकरच्या प्रलंबित बिलांसाठी निधीची मागणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून बिलांसाठी निधी प्राप्त होताच टँकर मक्तेदार व डिझेलची बिले दिली जातील.
एस. बी. पाटील,गटविकास अधिकारी, माण

COMMENTS