लस घ्या, बाकरवाडी न्या!  लसीकरण वाढण्यासाठी अनोखी योजना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लस घ्या, बाकरवाडी न्या! लसीकरण वाढण्यासाठी अनोखी योजना

नागरिकांचा लसीकरणाच्या मोहिमेला आणखी प्रतिसाद मिळावा, यासाठी ’पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’च्या माध्यमातून अनोखी शक्कल लढविली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या | LokNews24
सुशिक्षित तरूणांमधील हिंसक प्रवृत्ती चिंताजनकमुख्यमंत्री फडणवीस : केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय
‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पुणे/प्रतिनिधीः नागरिकांचा लसीकरणाच्या मोहिमेला आणखी प्रतिसाद मिळावा, यासाठी ’पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’च्या माध्यमातून अनोखी शक्कल लढविली आहे.’’लस घ्या अन् बाकरवडी घरी घेऊन जा..’’ अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. 

पुण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी त्यांना प्रोत्साहनपर खाद्य पदार्थ देण्यात येणार आहे. ’’पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’’ च्या माध्यमातून इंद्रनील चितळे यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. या माध्यमातून आठवडाभरात मिळून साधारण 15 हजार बाकरवडीची पाकिटे वाटण्यात येणार आहेत; मात्र यासाठी कोणतेही लसीकरण केंद्र ठरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अधिकाधिक नागरिक उत्सुकतेने लस घेतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला एक लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचाच हा एक भाग मानला जात आहे. याबाबत चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे म्हणाले, की आम्ही कोणत्याही एका केंद्रावर बाकरवडीची पाकिटे देणार नाही, तर वेगवेगळ्या केंद्रांवर स्वयंसेवांमार्फत पाकिटे दिली जाणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे.

COMMENTS