Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी प्राचार्य कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान    

अकोले ः  नाशिक येथे कवी कालिदास कला मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाचा आदिवासी समाजसेवक पुरस्कार आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यां

गटसचिवांना जिल्हा बॅंकने वैदयकिय विमा सुरक्षा कवच दयावे : कोल्हे
तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, २४ जून २०२१ l पहा LokNews24
परिक्रमा कॉलेजच्या संघाची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

अकोले ः  नाशिक येथे कवी कालिदास कला मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाचा आदिवासी समाजसेवक पुरस्कार आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव तथा अ‍ॅड. मनोहरराव देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य टी. एन. कानवडे यांना शासनाचा आदिवासी विकास विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना व  सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार राज्य सरकार दरवर्षी प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करत असते. चार वर्षांतील एकत्रित पुरस्कार आदिवासी विकास विभागाने नुकतेच प्रदान केले. कानवडे यांनी सन 1993-94  पासून आदिवासी भागातील राजूर येथील ड मनोहरराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य म्हणून शैक्षणिक व सामाजिक कामास सुरुवात केली.या काळात त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व सामाजिक कामात वेगवेगळे उपक्रम राबविले आहे. या पुरस्कार सोहळा साठी सत्य निकेतन परिवार व महाविद्यालयीन कर्मचारी  व राजूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS