Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपल्या माणसांनी केलेला सन्मान कौतुकास्पद – सचिन सूर्यवंशी

वारीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांचा गौरव

कोपरगाव प्रतिनिधी : आपल्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेल्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तरुणांचा, ग्रामस्थांचा, आप

मनरेगाकडून 2.30 कोटी निधी मंजूर ः आ. आशुतोष काळे
पंचनामे करून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ः आ. प्राजक्त तनपुरे
श्रीरामपुरात गांजासह 4 जण अटक, 1 फरार

कोपरगाव प्रतिनिधी : आपल्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेल्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तरुणांचा, ग्रामस्थांचा, आपल्याच गावातील थोरामोठ्यांनी केलेला यथोचीत सन्मान हा निश्‍चितच कौतुकास्पद असून गावातील पुढच्या पिढीस प्रेरणादायी ठरणारे कार्य असल्याचे गौरोद्गर कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी काढले.

     कोपरगाव तालुक्यातील वारी येथील भूमिपुत्रांनी शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच वारी ग्रामपंचायत, जय बाबाजी भक्त परिवार व राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून गेली 42 आठवडे श्रमदान आभियानातून गावाची स्वच्छता करणार्‍या स्वच्छता दुतांचा माजी सभापती मच्छिंद्र टेके पाटील मित्र मंडळाच्या वतीने नुकताच शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पुजन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात माजी सभापती मच्छिद्र टेके यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तरुणाच्या कार्याचा आढावा घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
           यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त सोमैया विद्यामंदिरच्या प्राचार्या सुनिता पारे, क्रीडा शिक्षक जॉन अमोलिक, पत्रकार फकीर टेके, सहकार क्षेत्रातील सचिन टेके, निलेश गायकवाड यांच्यासह 42 आठवड्यापासून श्रमदानातून वारी गावाची निरपेक्षपणे स्वच्छता करणारे सरपंच सतीश कानडे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, भाऊसाहेब टेके, मधुकर टेके, रावसाहेब जगताप, विलास गाडेकर, ज्ञानेश्‍वर जाधव, पंडित लकारे, संजय कवाडे, रवींद्र टेके, रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, विलास जगधने, मनोज जगधने, संदीप आगे, जितेंद्र टेके, रोहित टेके, चेतन वाळूंज, पोपट बनकर, शेषराव रगडे, मच्छिद्र गागरे, नंदा महिरे, उषा बागूल याचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, गोदावरी बायोरिफायनरीजचे सरव्यवस्थापक बाळासाहेब पालवे, कामगार अधिकारी संजय कराळे, उपसरपंच मनीषा गोर्डे, ग्रामपंचायत सदस्या अश्‍विनी खैरनार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सर्जेराव टेके यांनी मानले.

COMMENTS