Homeताज्या बातम्या

विधान परिषद जागावाटप: महाविकास आघाडीचे १५ जागांवर एकमत, दोन जागांवर मतभेद

काँग्रेस ८, ठाकरे ४, तर पवार गट ३ जागांवर लढणार; हर्षधवर्धन सपकाळ यांची माहिती मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीती

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणे बदलतायत भाजप-काँग्रेस-शिवसेना ‘ऑन मोड’, राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस
ठाकरे गटाचे आमदारही फूटीच्या उंबरट्यावर ?उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक
विरोधकांच्या गोटात खिंडार, अमरनाथ राजुरकरांची विजयी हॅट्रिक; सूक्ष्म रणनीतीने महायुतीने राखले वर्चस्व

काँग्रेस ८, ठाकरे ४, तर पवार गट ३ जागांवर लढणार; हर्षधवर्धन सपकाळ यांची माहिती

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. १७ पैकी १५ जागांवर सर्वपक्षीय एकमत झाले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. उर्वरित दोन जागांबाबत सध्या चर्चा सुरू असून पुढील काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईत झालेल्या आघाडीच्या बैठकीत जागावाटपाचा मोठा तिढा सुटल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार काँग्रेस ८, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे त्या संदर्भातील चर्चा अद्याप सुरू आहे.

असा आहे जागावाटपाचा प्राथमिक आराखडा:

  • काँग्रेस (८ जागा) : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर.
  • शिवसेना – उबाठा (४ जागा) : रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली आणि संभाजीनगर.
  • राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार (३ जागा) : पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरी जाईल. ही निवडणूक लोकशाही मूल्ये, संविधानिक तत्त्वे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परंपरांच्या रक्षणासाठी लढली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, सत्ताधारी पक्षांकडून आर्थिक प्रभाव आणि राजकीय दबावाचा वापर होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे आवाहन केले.

COMMENTS