राजकीय धुराळा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय धुराळा

राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे या एनसीबीच्या अधिकार्‍याविरोधात सुरु असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिक

कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !
वाढते प्रदूषण रोखणार कसे ?
राजकारणाचा उकीरडा

राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे या एनसीबीच्या अधिकार्‍याविरोधात सुरु असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका, आता भाजप आणि राष्ट्रवादी अशी सुरू झाली आहे. नव्हे ती नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी सुरू झाली आहे. आणि यातून एकमेकांचे अंडरवर्ल्ड संबंध कसे होते, ते सिद्ध करण्याची ही स्पर्धा सुरू झालेली आहे. मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या मालिकांमधून राजकीय धूराळा उडणार असला, तरी यातून काहीही सिद्ध होणार नाही, किंवा कुणी आरोपी ही ठरणार नाही, आणि कुणाला शिक्षा ही होणार नाही. कारण राज्यातील 11 कोटी जनतेला मूर्खात काढण्याचे हे उद्योग सुरू आहेत. नवाब मलिकांच्या जावयांना तब्बल आठ महिन्यानंतर जामीन मिळाल्यानंतर मलिक आपल्या जावयांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना कशा प्रकारे खोटया गुन्ह्यात अडकवले यासाठी प्रथम समीर वानखेडे यांच्या मागेल लागले. नंतर त्यांनी समीर वानखेडे यांच्यामागे मास्टरमाईंड भाजप असल्याचा दावा केला. तसेच यासंबंधी पुरावे हिवाळी अधिवेशनात उघड करणार असल्याचे सांगितले. मात्र यातून राजकीय धुराळा उडत असून, यातून भाजप-राष्ट्रवादी काँगे्रस या दोन्ही पक्षांतील नेत्यांची कामगिरी यानिमित्ताने समोर येत आहे. या अशा भुमिकांमुळे राजकारणांचा परीघ सातत्याने बदलत चालला असून, राजकारणांच्या प्रत्येक वक्तव्यातून विकासाचा अभाव दिसून येत असून, हे वक्तव्य फक्त राजकारण आणि स्वत:ची प्रतिमा सांभाळणारे राजकारण दिसून येते. त्यामुळेच मूळ विषयाला बगल देत, त्या प्रश्‍नांवर राजकीय रोख नेऊन ते, प्रश्‍न पचवून टाकण्याचे राजकारण्यांचे कसब आताच्या काळात दिसून येत आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण चर्चा, उत्तरे या राजकारणांचा बाज आता मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अलीकडच्या राजकारणांचा पोत हा सातत्याने बदलत असून, राजकारण आत्मकेंद्री झाल्याचे दिसून येते. सत्ताधारी आणि विरोधक लोकशाहीचे दोन अविभाज्य घटक असून, दोन्ही घटकांना महत्व आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तर सत्ताधार्‍यांनी देखील जवाबदारीने लोकशाहीत वागायला पाहिजे. शेवटी आपण जनतेला उत्तरदायित्व असू, याची काळजी घेत, विकासात्मक राजकारणांवर चर्चा झडायला पाहिजे. मात्र त्याचा अभाव दिसून येत आहे. भाजप-राष्ट्रवादी काँगे्रस या दोन्ही पक्षांनी आप-आपल्या राजकीय नेत्यांनी, कशी माया जमविली, त्याचा कच्चा चिठ्ठा काढणे सुरू आहे. राजकारणांत प्रवेश केल्यानंतर राजकारण्यांच्या संपत्तीत झपाटयाने होणारी वाढ हा संशोधनाचा विषयच म्हणावा लागेल. राजकारणांचे क्षेत्र आता पूर्वीसारखे पवित्र राहिले नाही. राजकारणांत आपले प्रस्थ टिकविण्यासाठी, कोणताही मार्ग अवलंबिवण्यात येतो. अर्थात ही मुजोरी येते ती आर्थिक संपादनातून. त्यामुळेच निवडणूक आयोगाने आता उमेदवारांना शपथपत्रांत आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार आहे. प्रत्येक दिवसांगणिक कितीतरी पटीने राजकारण्यांची संपत्ती वाढत जाते, ही संपत्ती येते तरी कुठून, आणि कोणत्या मार्गाने, याची कधी चौकशी होत नाही. देशभरातील लाखो राजकारणी गैरमार्गांने संपत्ती कमावून आपले राजकारणांतील स्थान टिकवून आहे. कारवाई होते, ती देखील राजकारणांतील शह-कटशहातून. त्यामुळे राजकारणांचे ज्यापकारे गुन्हेगारीकरण होत आहे, त्याचप्रमाणे राजकारणांत गैरमार्गांने येणारा पैसा याला कुठेतरी अटकाव घालण्याची गरज आहे.

COMMENTS