Homeताज्या बातम्यासंपादकीय

वाढते प्रदूषण रोखणार कसे ?

भारताताच नव्हे तर, जगभरात प्रदूषणाचा विळखा पृथ्वीभोवती घट्ट होतांना दिसून येत आहे. पृथ्वीभोवती प्रदूषण वाढत जात असल्यामुळे साहजिकच तापमानाची पातळ

एसटी संपाचा बागुलबुवा
नया पाकिस्तान
युद्धाचे धार्मिक संदर्भ

भारताताच नव्हे तर, जगभरात प्रदूषणाचा विळखा पृथ्वीभोवती घट्ट होतांना दिसून येत आहे. पृथ्वीभोवती प्रदूषण वाढत जात असल्यामुळे साहजिकच तापमानाची पातळी वाढतांना दिसून येत आहे. त्याचा मानवी जीवनांवर मोठत्त परिणाम होतांना दिसून येत आहे. प्रदूषणाचा हा विळखा वाढत चालला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ’द लॅन्सेट’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात वायू प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. या अहवालामध्ये जगभरातील वायू प्रदूषणाचा अभ्यास आणि गणना करण्यात आली आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे खोकला, घसादुखी, श्‍वसनासंबंधित आजार, डोळ्यात जळजळ, शरीरात थकवा जाणवणं यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. वाढतं वायू प्रदूषण ही धोक्याची घंटा आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याबाबत एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, जगात अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे हवा स्वच्छ आणि शुद्ध आहे. दिवसेंदिवस हवा अधिकाधिक विषारी होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. जगातील केवळ 0.0001 टक्के लोकसंख्या कमी प्रदूषित हवेत जगत आहे. वर्षभरातील 70 टक्के दिवसात हवा प्रदूषित असल्याची यातून दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे तापमान वाढ होत असतांना, त्याचा परिणाम जगातील प्रत्येक व्यक्तीला सहन करावा लागत आहे. अनेक जागतिक परिषदा घेत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अनेक देशांनी पुढाकार घेतला असला तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. भारतातील प्रदूषणाची भयावहता स्वित्झर्लंडच्या ‘आयक्यूएअर’ संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. वर्ष 2022 मध्ये मध्य व दक्षिण आशियातील 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 12 शहरे भारतातील असल्याची आकडेवारी या संस्थेने सादर केली आहे. राजस्थानातील भिवाडी शहर भारतातील सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. भारताची सरासरी पीएम 2.5 पातळी 53.3 ग्रॅम प्रति क्युबिक मीटर असून, वर्ष 2021च्या 58.1च्या तुलनेत ती किंचित कमी झाली आहे. एकीकडे जगभरात प्रदूषण वाढत चालले आहे. मुंबईने देखील दिल्लीपेक्षा अधिक प्रदूषण पातळी ओलांडली आहे. राजधानीमध्ये अनेक दिवस प्रदूषणामुळे शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र आता प्रदूषणाची समस्या केवळ राजधानीपुरती मर्यादित न राहता, प्रदूषणाची समस्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पोहचली आहे. त्याचबरोबर देशातील इतर राज्यात देखील प्रदूषण सातत्याने वाढत चालले आहे. मात्र देशाचा विचार करता, प्रदूषण रोखण्यासाठी आजही आपण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील हिवाळ्यातील हवामान वायू प्रदूषणाच्या संचयासाठी आदर्श आहे. ऑक्टोबरपर्यंत, पावसाळा संपतो, तापमान आणि आर्द्रता कमी होऊ लागते, वार्‍याचा वेग कमी होतो आणि सूर्यप्रकाशाचे दिवस कमी होतात. वर्षभर, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, उद्योग, बांधकाम आणि कृषी क्षेत्रासारख्या अनेक प्रदूषण निर्माण करणारे उपक्रम राबवले जातात. तथापि, हिवाळ्याच्या काळात, हवामानाची परिस्थिती अशी असते की विविध क्रियाकलापांमधून निर्माण होणारी धूळ आणि उत्सर्जन खालच्या वातावरणात अडकतात आणि त्यामुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढते. बर्‍याच दिवसात, आकाशाचा रंग राखाडी असतो, दृश्यमानता कमी असते आणि हवेत धूर आणि धुळीच्या कणांची जोरदार उपस्थिती असते ज्यामुळे श्‍वास घेणे कठीण होते. हवेतील खालावलेली गुणवत्ता आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात येतांना दिसून येत आहे. विकास करण्याच्या नादात आपण शाश्‍वत विकासाला विसरत चाललो असून, निसर्गाचे मोठया प्रमाणावर नुकसान करतांना दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे विकास साधत असतांना, प्रदूषण वाढणार नाही, त्याचबरोबर पर्यावरणाची हानी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र पर्यावरणीय मानकाकडे दुर्लक्ष करत, विकासाची राक्षसी महत्वाकांक्षेपोटी मोठया प्रमाणात भांडवलाची निर्मिती करणे सुरु असून, पर्यावरणाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असतांना, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येतांना दिसून येत आहे.

COMMENTS