मुकेश अंबानी यांची रिलायन्स देणार महाराष्ट्राला प्राणवायू!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुकेश अंबानी यांची रिलायन्स देणार महाराष्ट्राला प्राणवायू!

कोरोना रुग्णवाढीत ऑक्सिजनची निर्माण झालेली कमतरता भरून काढण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

Akole : राजूर येथे आगळे वेगळे गणेश विसर्जन
हिंदू तरुणाने मुस्लीम तरुणीशी लग्न केल आणि जीव गमावला
आमदारांनी बाजार समितीला राजकीय आखाडा बनवू नये

मुंबई/प्रतिनिधी : कोरोना रुग्णवाढीत ऑक्सिजनची निर्माण झालेली कमतरता भरून काढण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगर रिफायनरीमधून महाराष्ट्र सरकारला शंभर टन प्राणवायू पुरवला जाणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्य सरकारने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ऑक्सिजन पुरवठयाबाबत नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यात ऑक्सिजन, उपलब्धता आणि पुरवठा, त्याची वाहतूक करण्यासाठीची आवश्यक साधने यावर चर्चा करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीमधून महाराष्ट्रसाठी शंभर टन ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. यावर विभागीय आयुक्त, ठाणे आणि रायगड जिल्हाधिकारी तसेच एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती समन्वयाचे काम करणार आहे. त्याशिवाय नायट्रोजनची वाहतूक करणारे छोटे टँकर ऑक्सिजन पुरवठयासाठी वापरले जावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती शिंदे यांनी टी्वटमधून दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग प्रचंड आहे. शहरात ऑक्सिजन बेड्सची संख्या कमी असून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने इतर राज्यांमधून ऑक्सिजन मागवला आहे. मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्यालय असून अंबानी यांचे निवासस्थानदेखील आहे. रिलायन्सकडून पेट्रोलियम कोक गॅसिफिकेशनसाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्यामुळे कंपनीकडे उपलब्ध साठ्यापैकी शंभर टन ऑक्सिजन वैद्यकीय वापरायोग्य करून तो महाराष्ट्राला विनाशुल्क पुरवला जाणार असल्याचे रिलायन्समधील एका अधिकार्‍याने सांगितले. 

भारत पेट्रोलियमच्या कोची रिफायनरीमध्ये देखील 20 टन ऑक्सिजनचा साठा आहे. त्यातील काही ऑक्सिजन दक्षिणेत काही राज्यांना पुरवला जात आहे; मात्र याबाबत बीपीसीएलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

COMMENTS