महाराष्ट्रासह पाच राज्यात कोरोनाची लाट कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रासह पाच राज्यात कोरोनाची लाट कायम

नवी दिल्ली/मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र होते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून ही लाट ओसरत नसून, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्र

मंत्रीपरिषद विस्ताराचा अर्थ !
लोकन्यूज २४ Live : दुपारच्या बातम्या… महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांचा आढावा… (Video)
महाराष्ट्र शरमेने हिरमुसला !

नवी दिल्ली/मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र होते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून ही लाट ओसरत नसून, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यात चिंता वाढली आहे. या पाच राज्यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या 10 दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या 16 महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या 10 दिवसांत तब्बल 79 हजार 595 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे केरळमध्ये 1 लाख 28 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत महाराष्ट्र आणि केरळ पुन्हा एकदा देशातील एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा असणारी राज्य झाली आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र आणि केरळचा 53 टक्के वाटा असल्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा धोका असतांना, कोरोनाच्या दुसरी लाट कमी होतांना दिसून येत नाही. पर्यटनाच्या ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रविवारी देशात 37 हजार 154 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या आता वाढून 3 कोटी 8 लाख 74 हजार 376 झाली आहे. त्यापैकी उपचार घेणार्‍यांची संख्या ही रूग्णांची संख्या 1.46 टक्के आहे. सध्या भारतात 4 लाख 50 हजार 899 सक्रिय रुग्ण आहेत. तर देशात अद्याप अशी पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करत या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक पाठवण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंक कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय असून, लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मात्र कोरोना लसीकरणाचा बोजवारा उडाला असून, विविध राज्यांना लसीचा पुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणात अडथळे येतांना दिसून येत आहे. तरी देखील केंद्र सरकार गांभीर्याने लसीचा पुरवठा करतांना दिसून येत नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन देखील महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्ण संख्या कमी होतांना दिसून येत नाही.

कोरोना काळात उद्योगाचे अर्थचक्र सुरू राहावे : ठाकरे
कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. कोविड काळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकार्‍यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.

COMMENTS