Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त

म्हसवड / वार्ताहर : वाकी, ता. माण गावचे हद्दीत माणगंगा नदीचे पात्रात अवैध रित्या वाळू उपसा करताना सातारा पोलीस पथकाने छापा टाकून 17 लाख 45 हजार रुपये

श्रीं च्या पादुकासह प्रतिमेची ग्रामप्रदक्षणा
कामेरी येथील कब्बडी स्पर्धेचे निकाल जाहीर; सडोली, कासेगाव, इस्लामपूर, तासगाव, कौलव संघ पहिल्या फेरीत यशस्वी
माण तालुक्यातील सोन्या-छब्या बैल जोडीचा लंम्पीमुळे मृत्यू

म्हसवड / वार्ताहर : वाकी, ता. माण गावचे हद्दीत माणगंगा नदीचे पात्रात अवैध रित्या वाळू उपसा करताना सातारा पोलीस पथकाने छापा टाकून 17 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी, बालाजी दत्तात्रय पडवळे (वय 21, रा. दिवड, ता. माण), आनंदा आबा कारंडे (रा. कारंडेवाडी, ता. माण), सोनू सुभाष शिंदे (वय 21, रा. ढाकणी, ता. माण), मारुती साहेबराव दिडवाघ ( रा. दिडवाघवाडी, ता. माण), सुरज शिवाजी दिडवाघ (वय 22, रा. दिडवाघवाडी, ता. माण), रघुनाथ श्रीरंग माने (रा. वाकी, ता. माण, जि. सातारा), ट्रँक्टर चालक अमोल पुकळे, सचिन चव्हाण (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) तसेच अनोळखी चार ते पाच मजूरांनी आपसात संगणमत करुन शासनाची कोणतीही परवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे अवैद्य उत्खनन केले. तसेच डंपरमधून साडेतीन ब्रास वाळूची वाहतुक करताना व चार ब्रास वाळूचा ढिग करुन त्याची विक्री करण्याचा उद्देशाने होता. कारवाईदरम्यान 10 लाख रुपये किंमतीचा एक पिवळ्या रंगाचा जेसिबी, 7 लाख रुपये किंमतीचा अशोक लेलन्ड कंपनीचा डंपर, त्यामध्ये अंदाजे 21 हजार रुपये किमतीची साडेतीन ब्रास वाळू, 24 हजार रुपये किंमतीची चार ते पाच ब्रास वाळू असा एकूण 17 लाख 45 हजार रुपयाचा माल जप्त केला. अमोल पुकळे व सचिन चव्हाण हे ट्रँक्टर घेवून पळून गेले आहेत. याबाबतची फिर्याद पो कॉ. बाळू साहेबराव दांडेकर (नेमनूक पोलीस मुख्यालय सातारा) यांनी दिली. संशयितांविरोधात सरकारतर्फे म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि व्ही. एस. भंडारे करत आहेत.

COMMENTS