Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील अख्खा लोखंडी पूल चोरट्यांनी चोरला

मुंबई : येथील पश्‍चिम उपनगरातील मालाड येथील एका नाल्यावर अदानी यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या तब्बल सहा हजार किलो वजनाचा लोखंडी पूल चोरट्यांनी ल

Ahmednagar : नगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी | LOKNews24
दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू
एकलहरे शिवारात धाडसी दरोडा ; एकाचा खून

मुंबई : येथील पश्‍चिम उपनगरातील मालाड येथील एका नाल्यावर अदानी यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या तब्बल सहा हजार किलो वजनाचा लोखंडी पूल चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चार चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड येथील एका नाल्यावर अदाणी कंपनीतर्फे 90 फूट लांबीचा आणि तब्बल सहा हजार किलो वजनाचा लोखंडी पूल बांधण्यात आला होता. मात्र, 26 जून रोजी हा बांधलेला पूल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की हा पूल 6 जून पर्यंत जागेवर होता. घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांना तपासात अडथळे येत होते. मात्र, पोलिसांनी या सर्वांवर मात केली. पोलिसांनी जवळपासच्या भागात लावलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान 11 जून रोजी एक मोठा ट्रक पुलाच्या दिशेने पोलिसांना दिसला. पोलिसांनी ट्रकच्या क्रमांकावरून त्याचा माग काढला. या ट्रकमध्ये पोलिसांना गॅस कटिंग मशिन्स सापडली. या मशीनद्वारे तब्बल सहा हजार किलो वजनाचा लोखंडी पूल चोरट्यांनी लंपास केला. हा पूल बांधण्यासाठी ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते, त्याच कंपनीच्या काही कर्मचार्‍यांनी हा पूल चोरला असल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी गेल्या आठवड्यात कर्मचारी आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. घटनास्थळावरून चोरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. बांगूर नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तावडे म्हणाले की, पीएसमोठ्या विद्युत तारा वाहून नेण्यासाठी नाल्यावर बांधलेला पूल चोरीला गेल्याची तक्रार आम्हाला अदानी कंपनीकडून मिळाली. तेथे नवीन पूल बांधण्यात आल्याने हा जुना पूल तसाच पडून होता. या पुलाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. आम्ही जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज स्कॅन केले आणि 4 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हा पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या फर्मचा एक कर्मचारी आहे. पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS