Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्ला विरोधी कृती समितीच्या धारुर तालुका निमंत्रक पदी  देशमुख तर समन्वयकपदी  कुलकर्णी

किल्लेधारुर प्रतिनिधी - मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्ला विरोधी कृती समितीच्या किल्लेधारुर  तालुका निमंत्रक पदी महादेव देशमुख तर समन्वयक पदी धनंज

निळवंडे कालव्यांच्या कामांची अभियंता बाळासाहेब शेटे यांनी केली पाहणी
पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू
साकोली येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात.

किल्लेधारुर प्रतिनिधी – मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्ला विरोधी कृती समितीच्या किल्लेधारुर  तालुका निमंत्रक पदी महादेव देशमुख तर समन्वयक पदी धनंजय कुलकर्णी यांची बीड जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक दत्तात्रय अंबेकर व समन्वयक अभिमन्यू घरत यांनी निवड केली असुन त्यांचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ सदस्य तथा अधिस्वीकृती समितीचे विभागीय सदस्य अनिल महाजन यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी राज्यातील पत्रकारावर होत असलेल्या वाढत्या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्धार केलेला असुन याच संकल्पने मधून हल्ला विरोधी कृती समितीच्या बीड जिल्हा निमंत्रक पदी दत्तात्रय अंबेकर तर समनव्यक पदी अभिमन्यू घरत यांची निवड केली व त्यांना प्रत्येक तालुका स्तरावर निमंत्रक व समन्वयक नियुक्त करण्याच्या सूचना केल्या. या सूचना व आदेशानुसार तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकार्‍याशी संपर्क साधून बीड जिल्ह्यात परिषद आणखी बळकट कशी करता येईल हे उद्दिष्ट समोर ठेऊन तालुका हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक व समन्वयक यांची निवड करण्यात आली असुन ही निवड पुढील 2 वर्षासाठी असणार आहे. यामध्ये किल्लेधारुर तालुक्यासाठी निमंत्रक म्हणून महादेव केशवराव देशमूख तर समन्वयक म्हणून धनंजय उत्तमराव कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ सदस्य तथा अधिस्वीकृती समितीचे विभागीय सदस्य अनिल महाजन, डिजिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, विभागीय संघटक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर, नागनाथ सोनटक्के, महादेव तोंडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम शेळके, राजू मोरे,  ज्ञानेश्वर पोतदार, बलभिम मुंडे यांच्या सह सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS