परमबीर सिंगांनी मागितला ईडीकडे वेळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परमबीर सिंगांनी मागितला ईडीकडे वेळ

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

जरंडेश्वरचे भूत कुणाच्या मानगुटीवर बसणार ?
खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे
अविनाश भोसलेच्या चार कोटींच्या संपत्तीवर ईडीकडून टाच

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सिंग यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आणि आरोप झाले. याप्रकरणी त्यांची देखील ईडीकडून चौकशी सुरु आहे. मात्र त्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अजून थोडा वेळ मागितला आहे. आपली प्रकृती ठीक नाही, शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे कारण देत त्यांनी ईडीकडे वेळ मागितला आहे.
अनिल देशमुख यांनी टार्गेट देऊन 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपल्या पत्रात ते म्हणाले होते, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्‍वर बंगल्यावर बोलावले होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे 1750 बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला 40 ते 50 कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.

COMMENTS