मदर्स डेला काळिमा…त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मदर्स डेला काळिमा…त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

जागतिक मदर्स डेला (मातृदिन) काळिमा फासणारी घटना रविवारी नगरमध्ये घडली.

रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
 नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्या ः मा.आ.कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी : जागतिक मदर्स डेला (मातृदिन) काळिमा फासणारी घटना रविवारी नगरमध्ये घडली. एकाच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलिस मित्रांपैकी एकाने दुसर्‍या मित्राच्या आईला अश्‍लिल मेसेज टाकून लज्जा उत्पन्न होईल अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा निंदनीय प्रकार उघडकीला आल्याने संबंधित पोलिस कर्मचार्‍याच्याविरुद्ध येथील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    मदर्स डे च्या दिवशी असा प्रकार घडल्यामुळे पोलिस दलात असे कृत्य झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. रामदास सोनवणे (वय 32, पोलिस नाईक, तोफखाना) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, सोनवणे हा तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असताना, सोनवणे याने त्याच्या मित्राच्या आईला गेल्या पाच दिवसापासून टेक्स मेसेज पाठवले. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन (भाष्य) तो त्यातून करायचा. संबंधित महिला या प्रकाराला वैतागून गेली होती. ही हकीगत या महिलेने तिच्या मुलाला सांगितली. तसेच संबंधित महिलेने याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांंनाही दिली होती. त्यानंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विलास ढुमे यांनी तात्काळ या प्रकरणासंदर्भामध्ये तोफखाना पोलिसांशी संपर्क करून संबंधित प्रकार काय आहे याची खात्री करून तात्काळ गुन्हा दाखल करा, अशा प्रकारचे निर्देश दिले होते.

पोलिसांनी केली खातरजमा

त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संबंधित महिलेला आलेले मेसेज तसेच फोन रेकॉर्डिंग या सर्व बाबींची शहानिशा केली. संबंधित पोलिसाने त्या महिलेला अश्‍लील मेसेज पाठवून तिच्याशी फोनद्वारे गेल्या पाच दिवसांपासून लज्जा उत्पन्न होईल अशी मागणी त्याने केली होती. तसे त्याने व्हॉट्सअपद्वारेसुद्धा काही मेसेज पाठवलेले होते. पाठवलेले मेसेज व रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले व येथील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये सोनवणेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत. या संदर्भामध्ये पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी संबंधित पोलिसाला ताब्यात घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. रविारी मदर्स डे च्या दिवशीच हा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली असून, पोलिस दलाला व मदर्स डे ला काळीमा फासण्याचा प्रकार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

COMMENTS