Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरुदेवच्या आषाढी दिंडीला मोरेवाडीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

बाल वारकर्‍यांच्या पाऊल फुगडीने गावकरी मंत्रमुग्ध

अंबाजोगाई प्रतिनिधी - सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणजे आषाढी वारी. वारीमध्ये विठुरायाच्या दर्शनाची ओढ असणारे लाखो भक्त, वारकरी शेकडो किलोमीटरचे अं

रणवीर सिंग बनला नंबर वन !
दरीत पडलेल्या म्हशीच्या वासराला तरुणांनी दिले जीवनदान.
राज्यात लॉकडाऊननंतर बालविवाह वाढले

अंबाजोगाई प्रतिनिधी – सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणजे आषाढी वारी. वारीमध्ये विठुरायाच्या दर्शनाची ओढ असणारे लाखो भक्त, वारकरी शेकडो किलोमीटरचे अंतर भक्तीभावाने तहानभूक विसरून पार करतात. भूतलावर असणारा हा एकमेव आनंद सोहळा. अनेकांना आपल्या व्यापामुळे प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन वारसा आनंद घेता येत नाही. यासाठीच बनेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडीने मोरेवाडी नगरीमध्ये आषाढी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे व गुरुदेव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला मोरेवाडीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे विठुरायाची भक्ती आणि जाज्वल्य देशभक्ती याचा सुंदर मिलाफ या दिंडीच्या माध्यमातून गावकर्‍यांना पाहायला मिळत होता. भगव्या ध्वजा सोबतच बाल वारकर्‍यांच्या हाती राष्ट्रध्वजही दिमाखाने दौलत असलेला पाहून अनेक गावकर्‍यांनी याचे कौतुक केले. मस्तकी टीळा गोपीचंद हातामध्ये टाळ वीणा , पखवाज आणि मुखातून ज्ञानोबा तुकाराम नावाचा गजर करत असलेले बाल वारकरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. मोरेवाडी नगरीमध्ये आषाढी दिंडीने प्रवेश करतात त्या ठिकाणी मोरेवाडीचे सरपंच श्री औदुंबर मोरे तसेच देवबाप्पा महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी दिंडीचे विधिवत स्वागत केले. विणेकरी यांची पाद्य पूजा केली. मोरेवाडी येथील देवबाप्पा समाधी मंदिर परिसरात बाल वारकर्‍यांनी रिंगण तयार करून पाऊल सुरू करताच सर्वांनी विठू नामाचा जयजयकार केला. याप्रसंगी मोरेवाडी गावातील महिला गुरुदेव विद्यालयातील शिक्षक वृंद तसेच मोरेवाडी चे सरपंच श्री औदुंबर मोरे यांनीही वारकर्‍यांसोबत फुगडीचा आनंद घेतला. गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिनु आप्पा मोरे यांच्या वतीने बालवारकर्‍यांसाठी प्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बाल वारकर्‍यांच्या आगमनाने मोरेवाडी नगरीमध्ये जणू प्रति पंढरपूर अवतरल्याची जाणीव प्रत्येक नागरिकांना होत होती. आम्हाला आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण होत नाही परंतु गुरुदेव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला साक्षात पंढरपूरचे आणि वारीचे दर्शन करून दिल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. आषाढी दिंडी सोहळ्यासाठी मुख्याध्यापिका सौ.शशिकला काकडे, श्री मनेष गोरे, सौ ज्योती मोरे, शितल काळदाते, सौ संगीता मोरे, सोनाली कोनाळे, श्री तेलंग एस जे,श्री.विजय भिसे, श्री नामदेव शेरे, श्री दीपक इंगळे, श्री पंडित चव्हाण,प्रकाश बोरगावकर,सुग्रीव पवार ,श्रीमती नंदा चाटे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS