भेंडा गोळीबारातील जखमीच्या छातीतील गोळी काढण्यात यश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भेंडा गोळीबारातील जखमीच्या छातीतील गोळी काढण्यात यश

शेवगाव-नेवासे परिसरातील भेंडा बुद्रुक येथे 2 मे रोजी हॉलिबाल खेळताना झालेल्या गोळीबारातील जखमी सोमनाथ बाळासाहेब तांबे याच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात

जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी
Sangamner : विहिरीत सापडला पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह
राहुरी तालुक्यातील गुहा येथील मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा

अहमदनगर/प्रतिनिधी- शेवगाव-नेवासे परिसरातील भेंडा बुद्रुक येथे 2 मे रोजी हॉलिबाल खेळताना झालेल्या गोळीबारातील जखमी सोमनाथ बाळासाहेब तांबे याच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात शस्रक्रिया करून त्याच्या छातीत रुतून बसलेली गोळी काढण्यात यश आले आहे. सोमनाथची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरच दवाखान्यातून घरी सोडण्यात येणार आहे. 

    रविवार दि.2 मे रोजी रात्री 9:20 वाजेच्या सुमारास लांडेवाडीतील एका मैदानावर हॉलिबॉल खेळत असताना सोमनाथ तांबे (वय 21 वर्षे, रा.लांडेवाडी, भेंडा) याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता. गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत त्याला त्याच्या मित्रांनी नेवासा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला नगर येथे आणि नंतर पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. पुणे येथे त्याच्यावर शस्रक्रिया करून गोळी काढण्यात आल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे. दरम्यान, नेवासा पोलिसांनी पुणे येथे जाऊन ही गोळी पंचनामा करून ताब्यात घेतली आहे.

COMMENTS