भीम आर्मी आक्रमक… आमरण उपोषणाला सुरुवात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीम आर्मी आक्रमक… आमरण उपोषणाला सुरुवात

नगर - प्रतिनिधी शेवगांव नगरपरिषदे मधील सफाई कर्मचार्‍यांना किमान वेतन लागू करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त तसेच शेवगाव नगर परिषदेला वारंवार निवेद

धर्म रक्षणासाठी समर्पित जीवन असावे ः स्वामी प्रकाशानंदगिरीजी
अकोल्यातील रोटरी क्लबच्या टीमकडून वारकर्‍यांची सुश्रूषा
महंत सुभाष गिरी महाराज अनंतात विलीन | LOKNews24

नगर – प्रतिनिधी

शेवगांव नगरपरिषदे मधील सफाई कर्मचार्‍यांना किमान वेतन लागू करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त तसेच शेवगाव नगर परिषदेला वारंवार निवेदने देण्यात आलेले आहेत. परंतु शेवगांव नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधीत अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशन व अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात भीम आर्मी महाराष्ट्राचे  अध्यक्ष सितारामजी  गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राणांतिक आमरण उपोषण सुरु केले आहे.

      किमान वेतन कायदा अधिनियम 1948 नुसार किमान वेतन देणे बंधनकारक असताना देखिल संबंधीत अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. भीम आर्मी संघटनेने वारंवार तक्रार मागणीपत्र देवूनही अद्याप शेवगांव नगरपरिषदमधील सफाई कामगारांना किमान वेतनाचा लाभ दिलेला नाही .त्यामुळे शेवगांव नगरपरिषदेने सफाई कामगारांना किमान वेतन दराने वेतन दयावे अन्यथा आमरण उपोषण  सोडणार नसल्याचा  इशारा भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिला.

      यावेळी शाम जाधव पापाभाई बिवाल, सनी काकडे, गुलशन बिवाल, राहुल लोखंडे, अनिल मोहिते, मुकेश बगंन, सचिन बैद, पंडित जयकुमार, गोविंद जाधव, किरण माळी, सचिन जगधने, नरेंद्र काथवटे, अनिल लांडे, अशोक आहेर, गणेश बोरुडे, विशाल चव्हाण, आशिष कुडिया, सारिकाताई छजलाने, मंगल भारस्कर, ताईबाई मोहिते, हिरा मोहिते, कमल मगर यांच्यासह महिला सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS