नगरच्या बांधकाम व्यावसायिकास धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या बांधकाम व्यावसायिकास धमकी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मार्क्स कन्स्ट्रक्शन्सचे मकरंद कुलकर्णी यांना लँडमाफियाने धमकी दिल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक

लपूनछपून फिरणारे पाच तडीपार झाले अखेर जेरबंद…
मनपाच्या संभाव्य घरपट्टी वाढीविरोधात ; शहर काँग्रेस एल्गार पुकारण्याच्या तयारीत
कनिष्ठ शाखा अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले


अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मार्क्स कन्स्ट्रक्शन्सचे मकरंद कुलकर्णी यांना लँडमाफियाने धमकी दिल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे व संबंधित लँडमाफियावर कारवाईची मागणी केली आहे. जागेपोटी मोकी रक्कम द्या, अन्यथा कवडीमोल भावाने जागा देण्याची लॅण्ड माफिया मागणी करीत असल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकाराने नगरमधील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जागा बळकाविण्यासाठी माझ्या स्वत:च्या मालकीच्या जागेत जाण्यास लॅण्ड माफिया मज्जाव करीत असून, या जागेत संरक्षक भिंत टाकण्यास काही समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती विरोध करीत आहेत. त्यामुळे या व्यक्तींपासून माझ्या मिळकतीस व माझ्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन बांधकाम व्यावसायिक मकरंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मकरंद कुलकर्णी यांच्या मालकीची सावेडी येथे सर्वे नं. 44/2/10+44/2/4, प्लॉट नं. 1 अ, 1ब आणि 1 क/7 त्याचे क्षेत्रफळ अनुक्रमे 1257, 1312.50 व 1618.24 चौ.मी. आहे. ही जागा त्यांनी 2010 साली खरेदी केली होती. या जागेला बिगरशेती व अंतिम मुंजरी मिळाली आहे. या जागेशी कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. मात्र, या जागेच्या पश्‍चिमेला पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा प्लॉट असून, त्याचे बांधकाम चालू आहे. त्याने त्याच्या बांधकामाचे साहित्य आमच्या जागेत विनापरवानगी टाकलेले आहे. या मिळकतीमध्ये आऊट हाऊस बांधले आहे. या जागेत येण्यासाठी दक्षिण-पूर्व कोपर्‍यातून रस्ता असून, तेथे जाण्यास प्रयत्न केला असता हा गुंड प्रवृत्तीचा लॅण्ड माफिया वाद घालत आहे. तर काही गुंड जमवून धमक्या देत आहे. लॅण्ड माफियाच्या कुटुंबातील काही गुंड व्यक्ती या मिळकतीत जाण्यापासून मला रोखत आहे, तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. भूमी अभिलेख विभागाकडून 15 ऑगस्ट 2021 रोजी या जागेची मोजणी पोलीस संरक्षणात करून घेण्यात आली. त्यांनी दर्शवलेल्या हद्दीप्रमाणे या जागेला संरक्षक भिंत टाकण्याचे काम सुरु केले असता, हे काम बंद पाडण्याचे कृत्य लॅण्ड माफिया करीत आहे. या लॅण्ड माफियावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जागेवर हरकत, अडथळा निर्माण करुन ती जागा कवडीमोल भावाने बळकाविण्यासाठी त्याचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो. त्याचे दोन भाऊ या जागेत असून, या जागेत जाण्याचा प्रयत्न केल्यास ते शारीरिक इजा पोहोचण्यासाठी धमकी देतात. तर इतर हस्तकांमार्फत मोठ्या रकमेची मागणी करीत असून, ती न दिल्यास ही जागा कवडीमोल भावाने विकण्यास दडपण आणले जात असल्याचे निवेदनात कुलकर्णी यांनी म्हटले आहे. या जागेवर संरक्षक भिंतीचे काम सुरु केल्यास मागासवर्गीय कुटुंबीयांना पुढे करुन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. लॅण्ड माफिया असलेले तिघे भाऊ मला स्वत:च्या जागेत जाण्यास मज्जाव करीत आहे. या प्रकाराला वैतागून या जागेचा करारनामा दुसर्‍याच्या नावे करुन दिला आहे. त्यांना देखील ही व्यक्ती या जागेत जाण्यापासून रोखत असून, यामुळे जागेचा व्यवहार देखील अडला असून, जागा बळकाविण्यासाठी स्वत:च्या मालकीच्या जागेत जाण्यास मज्जाव करणार्‍या व संरक्षक भिंत टाकण्यास विरोध करुन धमकावणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लॅण्ड माफियावर कारवाई करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिक कुलकर्णी यांनी केली आहे.

COMMENTS