Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये आज रमाई चळवळीचे साहित्य संमेलन

अहमदनगर/प्रतिनिधी - रमाई 125 वी जयंती, सावित्रीमाई फुले 125 वा स्मृतीदिन, सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षे, महात्मा फुले लिखित ‘गुलामग

जामखेड विकास आराखडा नेमका कोणासाठी ?
२०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढेल… सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही…
मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्याचे भाग्य उजळणार

अहमदनगर/प्रतिनिधी – रमाई 125 वी जयंती, सावित्रीमाई फुले 125 वा स्मृतीदिन, सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षे, महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ ग्रंथास दीडशे वर्षे, ’प्रॉब्लेम ऑफ रूपी’ ग्रंथाचे शताब्दी वर्षे,  महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त रमाई मासिक, रमाई फाऊंडेशन, रमाई प्रकाशन, भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबादच्या वतीने दहावे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन शनिवार, 27 मे रोजी रमाई स्मृतिदिनानिमित्त अहमदनगर शहरातील पुणे बसस्टँड समोरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रमाई मासिकाच्या संपादक तथा संमेलनाच्या मुख्य निमंत्रक डॉ. रेखा मेश्राम यांनी दिली.
यावेळी रमाई मासिकाच्या कार्यकारी संपादक दैवशीला गवंदे, स्वागताध्यक्षा ललिता खडसे, प्रा. भारत सिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, अमरदीप वानखडे, कॉ. अनंत लोखंडे, एकनाथ गायकवाड, सुनीता गायकवाड, अर्चना गायकवाड, शोभा गाडे, लक्ष्मण मधाळे, राम गायकवाड, संजय सकट, अमर निर्भवणे आदी उपस्थित होते.  संमेलनाविषयी माहिती देतांना डॉ. मेश्राम यांनी सांगितले की, दि. 27 मे रोजी सकाळी 8 वाजता संविधान सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून माळीवाडा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते संमेलनस्थळ असा असणार आहे. संमेलनाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना होईल त्यानंतर सकाळी 9 वाजता संमेलनाध्यक्ष दिशा पिंकी शेख (प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता, श्रीरामपूर) उद्घाटक प्रा. प्रतिमा परदेशी (विद्रोही सांस्कृतिक चळवळ, पुणे), स्वागताध्यक्ष ललिता खडसे (रमाई फाऊंडेशन, औरंगाबाद) यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उषा अंभोरे (माजी संमेलनाध्यक्ष, वाशिम-2022), आशिष मुकूंद येरेकार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अ.नगर), डॉ. पंकज जावळे (आयुक्त, मनपा, अ.नगर), संदीप खडसे (परिवहन अधिकारी), हर्षद शेख (शिक्षणाधिकारी, पुणे), महेंद्र रोकडे (मुंबई), भीमराव बनसोड (औरंगाबाद), के.ई. हरिदास (अध्यक्ष, सत्यशोधक समाज), डॉ. संजय मून (औरंगाबाद) अ‍ॅड. एस.आर. बोदडे (औरंगाबाद), निलिमा बंडेल्लू (अहमदनगर), अ‍ॅड. सुभाष लांडे (ज.सेक्रेटरी, सी.पी.आय), स्मिता पानसरे (नेवासा), डॉ. सुधाकर शेलार (अहमदनगर), एकनाथ गायकवाड (अहमदनगर), प्रा. गंगाधर अहिरे (नाशिक), डॉ. सुधीर क्षीरसागर (अहमदनगर), राहूल कांबळे (शहराध्यक्ष, भा.बौ.म., अ.नगर), प्रा. किसन चव्हाण (शेवगाव), अ‍ॅड. डॉ. अरूण हिराबाई जाधव (जामखेड), डॉ. रश्मी पाथ्रीकर (अहमदनगर), डॉ. अनिल कुर्हे (प्रवरा), डॉ. वाल्मिक सरवदे (औरंगाबाद), चित्रा कुर्हे (नाशिक), शरद खरात (उत्तर महाराष्ट्र संघटक, अ.नगर), प्रतिक बारसे (जिल्हाध्यक्ष, दक्षिण अ.नगर), विशाल कोलगे (जिल्हाध्यक्ष, उत्तर अ.नगर), उत्तमराव पाटील (तरवडी, नेवासा), सुगंधराव इंगळे (जिल्हाध्यक्ष, उत्तर, अ.नगर, भा.बौ.म), भगवंत गायकवाड (जिल्हाध्यक्ष, दक्षिण, अ.नगर, भा.बौ.म), अतुल चौरपगार (पाथर्डी), डॉ. रवी खंडारे (सोनई), डॉ. जगदीश सोनवणे (अहमदनगर), डॉ. राहूल पंडित (अहमदनगर), डॉ. बलराज खोब्रागडे (अहदमनगर) आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आंबेडकरी स्त्रीवाद : डॉ. रेखा मेश्राम,रमाई चळवळीचे साहित्य संमेलनांची अध्यक्षीय भाषणे : संपा. डॉ. रेखा मेश्राम, सामाजिक एकता : रत्नकला बनसोड या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.  रात्री 8 वाजता विद्रोही सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर संमेलनाची सांगता होईल. या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे

COMMENTS