भाजपमध्ये मला संपवण्याचा प्रयत्न : पंकजा मुंडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपमध्ये मला संपवण्याचा प्रयत्न : पंकजा मुंडे

ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू : पंकजा मुंडेचा सूचक इशारामुंबई/प्रतिनिधी : धर्मयुद्ध टाळावं यावर स्पष्टीकरण देतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की

सरकारचा अधिवेशनातून पळ काढण्याचा डाव !
भाजपच्या बारा गोंधळी आमदारांचे निलंबन
फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर..’ l LokNews24

ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू : पंकजा मुंडेचा सूचक इशारा
मुंबई/प्रतिनिधी : धर्मयुद्ध टाळावं यावर स्पष्टीकरण देतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, धर्मयुद्ध हे आहे की, माझ्यात आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आहे. विधान परिषदेला फॉर्म भरायला लावला आणि रमेश कराडांना तिकीट दिले. राज्यसभेसाठीही माझी चर्चा असताना भागवत कराडांना संधी दिली. पण, तिथेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी गेले होते. मग आता मंत्रिमंडळात डावलले अशी कार्यकर्त्यांची भावना बनत चालली असून, एकप्रकारे हा मला संपवण्याचाच प्रयत्न आहे, मात्र मी संघर्षातून वर आली आहे. अशी संपणार नाही, अशी रोखठोक भूमिका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर बीड, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यातून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले. राजीनामे दिल्यानंतर मंगळवारी मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. आमच्याच नेत्यांना संधी देऊन, आमचे संंबंध खराब होऊ नये म्हणून आम्हाला लढावे लागणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती राज्यभर प्रवास करून संघटन करतो. मग त्यानंतर नेत्याला संघटनेत स्थान नसल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होतेय, असं पंकजा यांनी स्पष्ट केले.

इथे ’राम’ राहिला नाही असे वाटेल तेव्हा निर्णय घेऊ
माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टाळावे, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. त्यामुळे आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मोठया कष्टाने आपण आपले घर बनवले. मग मी माझे घर का सोडून जावू. ज्या दिवशी वाटेल इथे ’राम’ राहिला नाही असे वाटेल तेव्हा निर्णय घेऊ असा सूचक इशारा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीत दिला.

माझे काम राष्ट्रीयस्तरावर ; राज्यात कोणत्याच पदावर नाही
गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात काही नेत्यांनी असे विधाने केली की पक्षाने काय दिलं, हे पंकजा मुंडेंनी लक्षात ठेवावं. आणि ते विधान त्या नेत्यांकडून वारंवार केलं गेलं. माझ इतकंच म्हणणं आहे की पक्षाने मला जे दिले ते मी लक्षात ठेवेन, पण मलाच दिले नाही. अनेकांना दिले. मग सतत का बोलून दाखवले जाते. त्यावर आपण मोदी, शाह, नड्डा यांचे नाव घेतलं, मग देवेंद्र फडणवीसांचे का नाही घेतले? असा प्रश्‍न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर पंकजांनी उत्तर दिले. मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर नाही. माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच आहेत, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.

COMMENTS