भाजपच्या बारा गोंधळी आमदारांचे निलंबन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या बारा गोंधळी आमदारांचे निलंबन

मुंबई/प्रतिनिधी: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत एकमेकांना

फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर..’ l LokNews24
सरकारचा अधिवेशनातून पळ काढण्याचा डाव !
शिकारीच बनले सावज!

मुंबई/प्रतिनिधी: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत एकमेकांना भिडल्यामुळे पहिल्याच दिवशी विधानसभेत अभुतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्यामुळे विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
दुपारी विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना दालनात धक्काबुक्की करणार्‍यांना कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नबाव मलिक यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, सभागृहातील लांच्छनास्पद घटना घडली आहे. मी 36 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार पाहिले नाही. विरोधकांशी चर्चा करुनच पुढील कारवाई करा, असे आवाहनही त्यांनी केली. मात्र गदारोळ करणार्‍या 12 आमदारांचे निलंबनाचा प्रस्ताव अनिल परब यांनी मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. या कारवाईचा निषेध करत भाजप सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला.
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरु होता. मागासवर्गीय आयोग नेमून तो डाटा राज्य सरकारने मिळवावा असं म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी करत गदारोळ करण्यात आला.

‘या’ 12 आमदारांचे निलंबन
विधानसभेतील गदारोळ प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, अशिष शैलार, नारायण कुचे, पराग अळवणी, शिरीष पिंपळे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया या सदस्यांचा समावेश असून, त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना : भास्कर जाधव
मी दालनात बसलेलो असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रागात आले. ते इथेच चिडलेले होते. मी त्यांना बोललो या बसा. ते रागवलेले होते. चंद्रकांत दादा आले. मी त्यांना माझ्या बाजूच्या खुर्चीत बसवले. इतर सदस्यांनाही मी बसण्याची विनंती केली. मी त्यांना बोललो यातून मार्ग काढू. मात्र विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी या बाजूचे अनेक सदस्य आतमध्ये आले. मला आई बहिणीवरुन शिव्या देऊ लागले. घुसले तर घुसले, काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जसे गावगुंड असतात. तसे लोकप्रतिनिधी अंगावर आले. मी त्यांना सांगत होतो यांना आवरा. पण त्यांना आवरत नव्हते. तुम्ही 50-60 जण आले तर मी एकटा आहे. मी मागे हटणार नाही. मी मागे हटलो नाही. ही स्थिती महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. असेही तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.

हा तर मुस्कटदाबीचा बनाव : फडणवीस
सभागृहात निलंबन प्रस्ताव मांडण्यापूर्वी तालिका अध्यक्षांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण जी वस्तुस्थिती सांगितली, त्यात हे सांगितले पाहिजे की, तिथे शिवसेनेचे आमदारही आले होते. ते शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे आमदार यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी मी स्वतः पूर्ण लोकांना बाहेर काढले. हे खरे आहे की, आम्ही रागात होतो. बाचाबाची झाली. पण नंतर आपण गळाभेट घेतली. त्यानंतर आता असा प्रस्ताव येत असेल, तर सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करून घ्याल. हे खरे आहे की, काही लोकांचे शब्द चांगले नव्हते. त्याचक्षणी मी तुमची माफी मागितली. हे देखील नोंदवले पाहिजे. पण, हे पुढे करून विरोधकांची संख्या कमी करत असतील, तर हे लोकशाहीला योग्य नाही. हा तर मुस्कटदाबीचा बनाव असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

COMMENTS