बचत गटाच्या उत्पादनांनी ‘एकवीरा मार्केट’ गजबजले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बचत गटाच्या उत्पादनांनी ‘एकवीरा मार्केट’ गजबजले

संगमनेर (प्रतिनिधी ) राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिला स

ठेकेदाराने दिली मजुरांना दिवाळीची परस्पर सुट्टी..
आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स
संगमनेरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक 

संगमनेर (प्रतिनिधी ) राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिला सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या एकविरा फाउंडेशन च्या वतीने  बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना एकवीरा मार्केट गजबजले आहे. एकविरा फाउंडेशन च्या वतीने मागील तीन वर्षापासून महिला सबलीकरणासाठी महिलांची आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी यांसह आदिवासी भागांमधील मुलींमध्ये आरोग्याबाबतची जनजागृती केली आहे .सातत्याने सामाजिक उपक्रमात सहभाग घेताना गणेशोत्सवानिमित्त निर्माल्याचे संकलन ,पर्यावरण पूरक गणेश उत्सव, असे उपक्रम राबवताना दांडिया महोत्सव भरविला .आणि मागील तीन वर्षापासून एकविराच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यशोधन  मधील मोठ्या भव्य जागेत हे 32 स्टॉल मांडण्यात आले असून यामध्ये बचत गटांनी केली तयार केलेल्या विविध वस्तू मांडण्यात आले आहेत .यामध्ये खाद्यपदार्थ ,आकाश दिवे, दिवाळीच्या शोभेच्या वस्तू, रांगोळी, धूप, अगरबत्ती असे विविध वस्तू मांडण्यात आले आहेत. विक्रीच्या प्रदर्शनामुळे संगमनेरकरांना एक मोठी सुवर्णसंधी मिळाली आहे. या ठिकाणी प्रशस्त पार्किंग व अद्ययावत सुविधा तयार केले असल्याने ग्राहकांचा याठिकाणी मोठी गर्दी वाढला आहे. बचत गटाच्या महिलांना यामधून मोठा उत्साह मिळाला असून या एकवीरा मार्केटला महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात ,आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे ,इंद्रजीत भाऊ थोरात, सौ.शरयुताई देशमुख यांचेसह संगमनेर मधील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

COMMENTS