पत्रकार दातीर खूनप्रकरणाचा  तपास उपअधीक्षक मिटकेंकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार दातीर खूनप्रकरणाचा तपास उपअधीक्षक मिटकेंकडे

अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

बेलापूर-खंडाळा-अस्तगाव या रस्त्यांना निधी मंजूर करणार
केलीफोर्निया येथील साई भक्तांचे साई चरनी 41 लाख रुपये दान
तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी- राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणाचा तपास अखेर श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेच घेतली होती. त्यावेळी त्यांनी उपअधीक्षकांकडे तपास दिला जाईल व तरीही आरोपी सापडले नाही तर अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे तपास सोपवण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आता आधी उपअधीक्षक मिटकेंकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. 

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओतील काहीजणांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवून त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता कसून चौकशी व तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून दोन आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख यांना अटक करण्यात आली आहे. परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलिसांना अजून सापडले नसल्याने दातीर यांची पत्नी सविता दातीर यांनी आरोपीकडून जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करून पोलीस संरक्षण मागितले होते. ते पोलिसांनी त्यांना दिले आहे. दरम्यान, माजी आमदार कर्डिले व मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या खून प्रकरणाच्या अनुषंगाने एकमेकांबाबत केलेल्या वक्तव्याने या गुन्ह्यास राजकीय रंग येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राहुरी पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारांबाबत माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह अन्य एक जण फरार आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके (श्रीरामपूर) यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS