भाजपच्या नव्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सत्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या नव्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सत्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : मनपाच्या प्रभाग 9-क या पोटनिवडणुकीत विजयी झालेले भाजपचे नगरसेवक प्रदीपभय्या परदेशी यांचा सत्कार राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदा

त्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखा
कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा – ना. बाळासाहेब थोरात
कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एच.आर.सीटी. मशिन उपलब्ध करुन द्यावे : कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी : मनपाच्या प्रभाग 9-क या पोटनिवडणुकीत विजयी झालेले भाजपचे नगरसेवक प्रदीपभय्या परदेशी यांचा सत्कार राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांनी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवर शहर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना याबाबत अहवाल पाठवण्यात येणार आहे.
मनपाच्या प्रभाग 9-क या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार सुरेश तिवारी यांचा पराभव भाजपचे परदेशी यांनी केला आहे. तिवारी यांच्या प्रचाराचा नारळ शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी फोडला होता व ते प्रचारातही सक्रिय होते. पण तरीही तिवारी यांचा पराभव झाला. या पार्श्‍वभूमीवर आ. संग्राम जगताप यांचे वडील व स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांनी भाजपचे नवे नगरसेवक परदेशी यांचा सत्कार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत व शहर काँग्रेसने तर जाहीर नाराजी व्यक्त करीत राज्यातील आघाडीच्या नेत्यांकडे याबाबत तक्रारीची तयारी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने लढलेल्या शिवसेना उमेदवार सुरेश तिवारी यांचा पराभव करणार्‍या भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांचा राष्ट्रवादीने चक्क निवडून आल्याबद्दल सत्कार केल्यामुळे समाज माध्यमांवर त्या सत्काराचा फोटो व्हायरल झाला असून शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या गोष्टीची गंभीर दखल काँग्रेस पक्षाच्यावतीने घेण्यात आली असून रविवारी शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजप नगरसेवकाच्या केलेल्या सत्काराबाबतचा अहवाल पाठविण्याचा निर्णय घेण्याबाबत शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्याकडून चर्चा सुरू असल्याचे समजते.

पिता-पुत्र आघाडीच्या विरोधात?
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुंदेचा यांनी म्हटले आहे की, एका बाजूला राष्ट्रवादीचे आमदार पुत्र हे महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडतात. तर दुसर्‍या बाजूला त्याच उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर जातीयवादी भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीचे आमदार पिता सत्कार करीत त्यांना राष्ट्रवादीच्यावतीने शुभेच्छा देतात, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार पिता-पुत्रांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्याविरोधात अंधारातून काम करत महाविकास आघाडी उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे स्पष्ट झाले असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे व महाविकास आघाडीला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे, असा दावाही गुंदेचा यांनी यात केला आहे.

त्या सत्काराचीही दिली आठवण
गुंदेचा यांनी जुन्या गोष्टीची आठवण यानिमित्ताने करून दिली आहे. मागील काळात शिवद्रोही श्रीपाद छिंदम ज्या वेळी भाजपचा उपमहापौर झाला, त्यावेळी त्याचा देखील असाच सत्कार राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या कार्यालयात केला होता. आज शिवद्रोही छिंदमच्या जागी रिक्त झालेल्या जागेवरच्या पोटनिवडणुकीतून निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचा सत्कार करीत ही परंपरा राष्ट्रवादीच्या आमदारांनी जपली असून ही महाविकास आघाडीच्या वैचारिकतेला तडा देणारी आहे, असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, भाजपच्या तिकिटावर लढलेल्या छिंदमने शिवप्रेमींचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढत राज्यातील व नगर शहरातील तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या होत्या अशा पक्षाच्या उमेदवाराचा सत्कार करण्याची हिंमत राष्ट्रवादीच्या आमदारांची होतेच कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS