अमृतवाहिनी आय.टी.आय. च्या 45 विद्यार्थ्यांची टाटा मध्ये नोकरीसाठी निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनी आय.टी.आय. च्या 45 विद्यार्थ्यांची टाटा मध्ये नोकरीसाठी निवड

संगमनेर ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा सुरू झालेल्या औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज असून अमृतवाहिनी आयटीआय ने व

Sangamner : नांदुर ते बावपठार, माहुली रस्त्याची दुर्दशा (Video)
सरपंचाला घातला चप्पलांचा हार.. कठोर कारवाई करण्याची मागणी (Video)
Sangamner : तिसरी लाट थांबवायची असेल तर प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक (Video)

संगमनेर ( प्रतिनिधी )

कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा सुरू झालेल्या औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज असून अमृतवाहिनी आयटीआय ने विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर केलेल्या सामंजस्य करारातून संस्थेचे झालेल्या कॅम्पस इंटरव्यू मधून टाटा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीत 45 विद्यार्थ्यांची थेट निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य एस.टी. देशमुख यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी आयटीआय मध्ये पुणे येथील टाटा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीच्या वतीने कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न झाला. यावेळी पुणे प्लांटसाठी फिटर, इलेक्ट्रिशियन ,मेकॅनिकल मोटर व्हेईकल, मेकॅनिकल डिझेल, व वायरमन ट्रेडमधून 45 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी टाटा इंजिनिअरिंग लिमिटेड चे प्रतिनिधी आदेश संचेती उपस्थित होते. यावेळी प्राचार्य टी देशमुख ,साकुर आयटीआयचे प्राचार्य नामदेव गायकवाड हेही उपस्थित होते. अमृतवाहिनी आय.टी आयने सातत्याने गुणवत्ता जपली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे .संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीआय आणि राज्यभरातील विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सामंजस्य करार केला असून यामधून सातत्याचे कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन केले जात आहे. यातूनच विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळाली आहे .याकामी ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे समन्वयक संजय कुटे, संदीप दिघे, एस. पी. मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयुताई देशमुख ,बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, आर बी सोनवणे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा व्ही बी धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS