पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपने राज्यात भूकंप; आत्महत्या इशार्‍याने खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपने राज्यात भूकंप; आत्महत्या इशार्‍याने खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

अहमदनगर-पारनेर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्याने तसेच या क्लिपच्या माध्यम

भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर
सावधान…कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय…;

अहमदनगर-पारनेर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्याने तसेच या क्लिपच्या माध्यमातून त्यांनी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या दहशतीच्या कारभाराकडे त्यांचे स्पष्ट नाव न घेता लक्ष वेधल्याने शुक्रवारी राज्यात भूकंप झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, देवरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. ती सखोलपणे चौकशी सुद्धा चालू आहे. त्यातून बचाव करण्यासाठी केलेला केविलवाणी प्रयोग आहे, असा दावा आ. लंके यांनी देवरेंच्या क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केला. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या शुक्रवारी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाणसारखा आत्महत्येचा मार्ग का स्वीकारू नको, असा सवाल त्यांनी यात उपस्थित केला आहे. यात त्यांनी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. या क्लिपमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पातळीवरदेखील याची दखल घेतली गेली आहे तर दुसरीकडे आमदार लंके यांनी खुलासा देत तहसीलदार देवरे यांच्यावर आरोप केले आहेत. देवरेंवर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेव त्यातून बचाव करण्यासाठी त्यांनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असे लंके यांचे म्हणणे आहे.

त्रास व छळाची मांडणी
तहसीलदार देवरे यांच्या आवाजातील व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवेरे यांनी या क्लिपमध्ये निवेदन केले आहे. शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाली. दीपाली, मी लवकरच तुझ्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात, याबाबत त्यांनी या क्लिपमध्ये आरोप केले आहेत. आपल्याविरुद्ध विधिमंडळात प्रश्‍न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण
केल्याची तक्रार माझ्या गाडीचालकाकडून लिहून घेणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे, असे अनेक प्रकार घडले आहेत, असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. याबाबतचे कथन करताना त्या अनेकदा रडतही आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर तालुक्यासह राज्यभर खळबख उडाली असून यासंदर्भात तालुक्यात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. लंके म्हणाले, आठ दिवसापूर्वी त्यांच्यावर (देवरे) गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. नाशिक विभागीय आयुक्त गमे यांनी तसा अहवाल मुंबईला पाठवला आहे. यापूर्वीही बरेच प्रयोग त्यांनी केले आहेत. कामात गलथान कारभार झाला, भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या. त्या वेळेस मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला. त्या-त्या वेळी त्यांनी रात्री-अपरात्री मेसेज करून सांगितले की जर तुम्ही या गोष्टी उघड केल्या तर मी आत्महत्या करेन. असे आतापर्यंत बरेच प्रकार झाले आहेत. ज्या विभागात त्या काम करतात, त्या विभागातील अधिकार्‍यांनाही त्या दोषी धरतात. तुम्ही साधुसंत यांसारखे काम करता आणि बाकीचे चुकीचे काम करता, असे दाखवण्याचा प्रयोग केला जातो. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. ती सखोलपणे चौकशी सुद्धा चालू आहे. त्यातून बचाव करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयोग आहे, असा दावाही आ. लंके यांनी केला आहे.

ती क्लिप देवरे यांचीच : जिल्हाधिकारी
ती ऑडिओ क्लिप ही पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचीच असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. देवरे यांनी यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी तक्रार केली असून त्याची महिला आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. या क्लिपवर काय धोरण घ्यायचे, हे प्रशासनाने अद्याप ठरवले नसल्याचे डॉ.भोसले म्हणाले.

COMMENTS