दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान

नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणांच्या परिसरात बर्‍यापैकी पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या खोर्‍यातील नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात समाधानाचे वातावरण आहे.

छतावरील सौर ऊर्जेच्या तब्बल ८११ मेगावॅट विजेची यंत्रणा नेटमिटरींगद्वारे कार्यान्वित
कोठला परिसरात गोवंशीय मांसासह एकास अटक
मुंबईतील चर्चेत धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच

अहमदनगर/प्रतिनिधी- नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणांच्या परिसरात बर्‍यापैकी पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या खोर्‍यातील नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात समाधानाचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून आता नव्या पाण्याची आवक सुरू झाल्याने यापुढे चांगला पाऊस झाला तर गोदावरी नदीला पाणी येऊन कोपरगाव, नेवासे व शेवगाव तालुक्यांतील शेतकर्‍यांच्यादृष्टीने ते दिलासादायक ठरणार आहे. 

     नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन होत आहे. दारणाच्याया पाणलोटात इगतपुरी, घोटी तसेच भावली परिसरात मागील 24 तासांत बर्‍यापैकी पाऊस झाला. तो फारसा समाधानकारक नसला तरी दारणाचा साठा 1 जूनला 19.29 टक्के इतका होता व तो दोन दिवसांपूर्वी 30.31 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. या धरणात दोन दिवसांपूर्वीचा उपयुक्त साठा 2167 दलघफू होता, मागील वर्षी याच काळात हा साठा 3372 दलघफू होता. दारणापासून काही अंतरावर असलेल्या भावली धरणाच्या परिसरात मात्र पावसाचे जोरदार आगमन होत आहे. दोन दिवसांपूर्वी भावलीच्या पाणलोट क्षेत्रात 78 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीचा साठा 1 जूनला 14.91 टक्के होता. तो आता 28.96 टक्क्यांवर पोहचला आहे. 1434 दलघफू क्षमतेच्या या धरणात 415 दलघफू पाणीसाठा आहे. कडवा धरणाच्या परिसरात पावसाचा फार जोर नाही. कडवाचा साठा 14.57 टक्क्यांवरून 15.64 टक्क्यांवर पोहचला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाचे येणे फार समाधानकारक नाही. गंगापूरचा साठा 1 जूनला 43.62 टक्के इतका होता. मात्र पाणी वापरामुळे तो 38.17 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे या धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाची गरज आहे.

COMMENTS