Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यवस्थेला प्रश्न विचारणारी विवेकी पिढी घडली पाहिजे – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

अंबाजोगाई प्रतिनिधी - आजच्या काळात वर्गात शिकविलेले, पुस्तकात लिहिलेले घोकंपट्टी करून, आहे तेच सत्य आहे हे मानून चालणार्‍या पिढीपेक्षा चालत आलेल्

परभणींचे 27 विद्यार्थी श्रीहरीकोटा सहलीसाठी रवाना-उपग्रह प्रक्षेपणाचा घेणार अनुभव
रिचा चड्ढा आणि अली फजलचा होणार शाही विवाहसोहळा
देशातील स्थैर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच : शरद पवार

अंबाजोगाई प्रतिनिधी – आजच्या काळात वर्गात शिकविलेले, पुस्तकात लिहिलेले घोकंपट्टी करून, आहे तेच सत्य आहे हे मानून चालणार्‍या पिढीपेक्षा चालत आलेल्या जुन्या रूढी, परंपरा, बाद झालेले सिद्धांत, कालबाह्य झालेले ज्ञान यांना आव्हान देऊन प्रस्थापित व्यवस्थेला, समाजाला, संस्कृतीला, अज्ञानाला, अंधश्रद्धा यांना असे का हे प्रश्न ताकदीने विचारणारी विवेकी पिढी घडविण्याची मोठी गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. ते जिजाऊ प्रायमरी स्कुलच्या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपप्राचार्य प्रा.वसंतराव चव्हाण, के.डी.एसचे संचालक शिवसागर सिंग, शाळेच्या प्राचार्या मोरे, बाबासाहेब बरीदे , शाळेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम, संचालक सुरेश कदम या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात शिक्षणाच्या देवता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करून करण्यात आली. यावेळेस पुढे बोलतांना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी, पालकांनी आपल्या मुलांची जिज्ञासा, संशोधक वृत्ती, चिकित्सक बुद्धी यांना वारंवार प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच जीवन ही क्रमांकाची स्पर्धा नसून पालकांनी कृपया मुलांना गुणांच्या मोजमापात तोलू नये. आपली शिक्षण पद्धती ही नोकरदार घडविणारी असून मुलांच्या बुद्धी कौशल्याला येथे वाव मिळत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुणांना ओळखून त्याप्रमाणे त्यांचे आयुष्य, भविष्य घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.इंगोले यांनी उपस्थितांना केले. यावेळी शाळेचे संचालक सुरेश कदम यांनी शाळेमध्ये मुलांना शिक्षणासोबतच मानवी मूल्यसंस्कार देण्याचे काम केले जात असल्याचे सांगत भविष्यात या शाळेतून अनेक शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर्स घडतील अशी आशा व्यक्त केली. यावेळी माजी उपप्राचार्य प्रा.वसंतराव चव्हाण, बी.डी.सिंग, बरींदे सर, रमेश कदम यांनी समायोचित मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानीक प्रयोग सिद्धांत या प्रदर्शनात मांडून त्याचे दैनंदीन जीवनातील उपयोग आलेल्या पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार शाळेच्या शिक्षिका सुषमा गरसोळकार यांनी मानले.

COMMENTS