तांबवे पुलानजीकच्या नदीपात्रात सापडले जिवंत बॉम्ब

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तांबवे पुलानजीकच्या नदीपात्रात सापडले जिवंत बॉम्ब

कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीच्या पात्रामध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या मुलांना

घाटकोपरमध्ये गुजराती पाट्यांची तोडफोड
कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभेचा समारोप
रूढी-परंपरांना फाटा देत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त दिली देणगी

कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीच्या पात्रामध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या मुलांना

जिवंत ग्रेनाईट (बॉम्ब) सापडले. या घटनेची माहिती संबंधित युवकांनी कराड तालुका पोलिसांनी देताच पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. या वृत्ताला पोलिस अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. सोमवार, दि. 17 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात बॉम्ब सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीच्या पात्रामध्ये सोमवारी सकाळी काही युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी त्या युवकांनी नदीच्या पाण्यात गळ (जाळी) टाकल्यानंतर त्यांच्या गळाला मासा लागला असल्याचा अंदाज आला. त्यांनी तो गळ नदीच्या पात्रातून पाण्याबाहेर काढला. त्यावेळी त्यामध्ये ग्रेनाईट (बॉम्बे) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते अतिशय अवजड असल्याने त्यांना याबाबत शंका आली. मासेमारी करणार्‍या युवकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS