Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घाटकोपरमध्ये गुजराती पाट्यांची तोडफोड

मुंबई ः मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी तृप्ती देवरुखकर यांच्या प्रकरणामुळे मराठी गुजराती वाद चांगलाच पेटला. या वादानंतर आता घाटकोपरमध्ये देखील मरा

केलीफोर्निया येथील साई भक्तांचे साई चरनी 41 लाख रुपये दान
देशात रस्ते अपघातात 12 टक्क्यांनी वाढ
चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे (Video)

मुंबई ः मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी तृप्ती देवरुखकर यांच्या प्रकरणामुळे मराठी गुजराती वाद चांगलाच पेटला. या वादानंतर आता घाटकोपरमध्ये देखील मराठी-गुजराती वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच मनसे कार्यकर्त्यांकडून घाटकोपरमध्ये गुजराती फलक तोडण्यास सुरुवात करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधील एका उद्यानाचा मारो घाटकोपर हा गुजराती बोर्ड मंगळवारी सकाळी तोडला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या विविध ठिकाणच्या गुजराती पाट्या तोडल्यात. घाटकोपर पूर्वेकडील आर.बी.मेहता मार्गावरील चौकाला गुजराती पाटी लावण्यात आली होती. ती पाटी देखील कार्यकर्त्यांनी तोडल्यामुळे वाद उफाळून आला आहे.

COMMENTS