वेब टीम : मुंबईमहिला असो अथवा पुरुष आपल्या चमकदार सुंदर व निकोप त्वचेमुळे चार लोकांमध्ये आपण उठून दिसावे असे प्रत्येकालाच वाटते, आपल्या शरीरावरील
वेब टीम : मुंबई
महिला असो अथवा पुरुष आपल्या चमकदार सुंदर व निकोप त्वचेमुळे चार लोकांमध्ये आपण उठून दिसावे असे प्रत्येकालाच वाटते, आपल्या शरीरावरील आवरण म्हणजे त्वचा. त्वचेचे एकूण सात थर असतात. त्वचेच्या आतील आवरणामध्ये निर्माण होणाऱ्या मेलेनिन नावाच्या घटकामुळे त्वचेचा रंग ठरत असतो. व्यक्तीच्या त्वचेचा रंग हा जन्मजात अनुवंशिकतेमुळे ठरत असतो. तसेच त्वचेतील मेलॅनिन नावाचा घटक त्वचेचा रंग कमी अधिक होण्यास कारणीभूत ठरत असतो. त्वचेचे सौंदर्य जपण्याकरता आपण अनेक उपाय करतो.
आपली त्वचा ,तजेलदार व चमकदार रहावी याकरता अनेक घरगुती उपाय आपण करतो तसेच बरेच लोक हजारो रुपये खर्च करुन महागड्या केमिकल पील ऑफ ट्रीटमेंट करून घेतात. ब्युटी सलून व पार्लरमध्ये जाऊन स्त्री-पुरुष त्वचेची देखभाल घेतात. बरेचसे स्किन क्लिनिक आपल्याला या ट्रीटमेंट व सेवा पुरवत असतात तरी यांचा दूषपरिमाण आपल्याला काही कालवधी नंतर आपल्याला जाणवू लागतात .
शरीरावरील त्वचेच्या सौंदर्याबरोबरच चेहऱ्याच्या त्वचेचे सौंदर्य जपणे देखील महत्वाचे आहे. आपला चेहरा निकोप, तजेलदार,डाग विरहित व चमकदार व तरुण रहावा याकरता अनेक प्रयोग व उपाय योजना केल्या जातात.चंदनयुक्त, हळदयुक्त, गुलाब जलयुक्त हे सगळे जाहिरातीचे फंडे असतात. या क्रीम्समध्ये सुगंधी केमिकल वापरतात ज्यामुळे केवळ ग्राहकांची फसवणुक व उत्पादनाचा खप करणे हा एकमात्र उद्देश्य कंपनी मालकाचा असतो. ही केवळ मार्केटींग स्किल आणि स्ट्रॅटेजी असते. तरी आपण पारंपारिक आणि जुन्या पद्तींचा वापर केल्याने आपण आपके सौदर्य टिकून ठेवू शकतो …
नैसर्गिक पदार्थ जसे हळद,मुलतानी माती, चंदन, बेसन हे पदार्थ फार प्राचीन काळापासुन सौंदर्य वृद्धि करता वापरले जातात. मात्र धावत्या युगात वेळेचा अभाव व सगळे आयतेच हातात पाहिजे ही वृत्ती असल्याने हाताने करत बसण्यापेक्षा चार पैसे फेकुन काय ट्रिटमेंट करायची ती करु असा कल लोकांचा होत चालला आहे. ताेच मध्यमवर्गातील स्त्री-पुरुष कोणत्याही माहितीशिवाय केवळ जाहिराती पाहुन घरात प्रोडक्ट्स घेवुन येतात. या जाहिरातीतील केमिकलयुक्त स्किन केअर प्रोडक्ट्स मध्ये पॅराबिन्स, सल्फेट्स यासारख्या घातक केमिकल्सचा भरमसाट वापर केला जातो. त्वचेची निगा राखण्याचा दावा करणार्या बॉडी लोशन्स, मॉईश्चरायझर, स्किन क्रीम मधिल केमिकल त्वचेला हानी पोहचवून त्वचेच्या स्किन सेल्स डॅमेज करतात, ज्यामुळे स्किन डिसिज व स्किन कॅन्सर देखील होऊ शकतात.
COMMENTS