महाभारतात असलेले १० सर्वात शक्तिशाली योद्ध्ये तुम्हाला माहित आहेत का?

Homeदेशधर्म

महाभारतात असलेले १० सर्वात शक्तिशाली योद्ध्ये तुम्हाला माहित आहेत का?

महाभारत- रामायण आपण लहानपणापासून वाचत, पाहत, ऐकत आलो आहोत. याच महाभारतात काही योद्ध्ये असे होते की, त्यांच्या शक्तीची तुलना करणे आवश्यक वाटते. त्

मोदी सरकारची प्रधानमंत्री जन धन लूट योजना
कोल्हापूर जिल्ह्यात पात्र पूरग्रस्तांची रक्कम अपात्र व्यक्तीच्या खात्यात
शेतक-यांशी चर्चेस केंद्र सरकार तयार

महाभारत- रामायण आपण लहानपणापासून वाचत, पाहत, ऐकत आलो आहोत. याच महाभारतात काही योद्ध्ये असे होते की, त्यांच्या शक्तीची तुलना करणे आवश्यक वाटते. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत, महाभारतातील हे सर्वात शक्तिशाली असे १० योद्ध्ये.

१)भीमाचा नातु आणि घटोत्कचाचा मुलगा बार्बरीक

केवळ तीन बाणांमध्ये युद्ध संपवीण्याची क्षमता असलेला एकमेव योद्धा. शेवटी नाईलाजाने भगवान श्रीकृष्णाला एका ब्राम्हणाचे मायावी रुप घेवुन त्याचा वध करावा लागला.

२)दानवीर कर्ण 

परमात्मा भगवान श्रीकृष्ण रथावरती आरुढ असतानाही, महाबली हनुमान रथावर आरुढ असतानाही अर्जुनाचा रथ प्रत्येक बाणाबरोबर चार इंच मागे ढकलु शकण्याची क्षमता असलेला वीर

३)कुंतीपुत्र अर्जुन 

कर्णाशी सरळ सरळ दोन हात करण्याची क्षमता असलेला एकमेव पांडव

४)पीतामह भीष्म 

आपले गुरु आणि विष्णुचा सातवा अवतार परशुराम यांना युद्धात हरवीण्याची क्षमता असलेला एकमेव योद्धा

५)कुंतीपुत्र भीमसेन 

या महाबलीमध्ये दहा हजार हत्तींचे बळ होते.

६)गांधारीपुत्र दुर्योधन 

संपुर्ण विश्वात गदायुद्धात अजींक्यपदी राहीलेला एकमेव योद्धा

७)जयद्रथ 

याची कर्तबगारी काही खास नसली तरी अभीमन्युवधावेळी त्याला पुर्वीच मीळालेल्या एका वरदानाचा वापर करता आला आणि म्हणुनच त्या दिवशीचा गैरफायदा घेवुन अभीमन्युचा यशस्वीरित्या वध शक्य झाला.

८)घटोत्कच 

आपल्या मायावी शक्तीने कर्णाला त्याच्याजवळ असलेली अमोघ वासवी शक्ती वापरण्यासाठी विवश करु शकणारा योद्धा

९)अश्वत्थामा 

भलेही याच्या नशीबी कीतीही द्वेष असला तरीही ज्यापद्धतीने त्याने शेवटच्या घटका मोजत असलेल्या दुर्योधनाकडुन स्वत:ची सेनापतीपदी नियुक्ती करवुन पुढे पाच पांडवपुत्र, दृष्ठघुम्न आणि शिखंडीची हत्या करुन वचपा काढला त्या अर्थी हा एक विषारी बाण कौरवांकडे फार दुर्लक्षित राहीला होता.

१०)घृतराष्ट्र

याच्या अंगात काही शे हत्तींचे बळ होते जे त्याच्याकडुन भीमाला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करतेवेळी उघड झाले.

COMMENTS