कांद्याचे दर दिवाळीपर्यंत राहणार ’तेजीतच’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्याचे दर दिवाळीपर्यंत राहणार ’तेजीतच’

मुंबई : कांदा हे नगदी पीक असून कधी शेतकर्‍याच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. यावेळी मात्र, मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच

नवरात्रोत्सव संपताच कांदा कडाडला
नवी मुंबई, पनवेल महापालिकेकडून दिवाळी भेट
मनोरा आमदार निवासाच्या कामाचा आज शुभारंभ

मुंबई : कांदा हे नगदी पीक असून कधी शेतकर्‍याच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. यावेळी मात्र, मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच्या दरात वाढ होत आहे. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे ऐन सणामध्ये किचनचे बजेट हे कोलमडले आहे. मात्र कांद्याचे दर दिवाळीपर्यंत असेच तेजीत राहण्याची शक्यता आहे.
कांद्याचेच नव्हे तर इतर सर्व भाजीपाल्याचेही दर हे वाढलेले आहेत. ठोक बाजारात हे दर नियंत्रणात असले तरी मात्र, किरकोळ बाजारात गगणाला भिडलेले आहेत. हवामानाचा परिणाम आणि मध्यंतरी पावसाचा मारा यामुळे भाजीपाल्याचे प्रचंड असे नुकसान झाले होते. त्यामुळेच आता दर वाढलेले आहेत. मध्यंतरीच्या पावसामुळे भाजीपाल्याचा पुरवठा हा शहरी भागात सुरळीत झाला नाही त्यामुळे मागणी वाढली पण पुरवठा न झाल्याने दर वाढत आहेत. नाशिक ही देशातील कांद्याची महत्वाची बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेतील कांद्याचा पुरवठा देशाच्या राजधानी दिल्लीत होत आहे. कांद्याबरोबर इतर भाजीपाल्यांचेही दर हे वाढलेले आहेत. वाहतूक वेळेत न झाल्याने महानगरातील दर वाढलेले आहेत

भाजीपाल्यांचे दरही कडाडले
भाजीपाल्याची आवक कमी प्रमाणात असल्यामुळे भाजीपाल्यांचे दरही कडाडले आहेत. पावसामुळे यंदा शेतीचे गणितच बिघडले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने भाजीपाल्याची लागवड ही वेळेत झाली नाही. आता पावसाने उघडीप दिली आहे. पण खूप उशीर झाला आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला बाजारात येईपर्यंत भाजीपाल्यांचे दरही असेच वाढलेले असणार आहे.

COMMENTS