Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातुरात अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले; पाच महिन्यात 1 हजार 746 गुन्हे दाखल

लातूर प्रतिनिधी - जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांना झटका देत लातूर पोलिसांनी गत पाच महिन्यात विविध पोलिस ठाण्यात तब्बल 1 हजार 746 गुन्हे दाखल केले आ

सोमठाणा गावच्या चेअरमन पदी बिनविरोध मारोती पांडुरंग कदम पांडे तर व्हाईस चेअरमन पदी नामदेव शंकरराव पा. शिंदे
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन
नायब तहसीलदारांचे काम बंद आंदोलन; राजपत्रित वर्ग-2 संवर्गाच्या ’ग्रेड पे’च्या वाढीची मागणी

लातूर प्रतिनिधी – जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांना झटका देत लातूर पोलिसांनी गत पाच महिन्यात विविध पोलिस ठाण्यात तब्बल 1 हजार 746 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण 2 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 20 ऑक्टोबर 2022 मध्ये पदभार स्वीकारला. तर गत पाच महिन्यात त्यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली. दरम्यान, अवैध व्यवसायाची माहिती थेट आपल्या मोबाईलवर, व्हाट्सएपवर द्या, असे नागरिकांना जाहीर आवाहन केले. त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल नंबरच नागरिकांना देऊन टाकला. यातून प्राप्त तक्रारी, माहितीच्या आधारे तातडीने विशेष पथकांनी अवैध व्यवसायावर छापा टाकला आहे. ही कारवाई मार्चअखेरची असून, जिल्ह्यातील विविध 23 पोलीस ठाण्यात तब्बल दोन हजार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत 2 कोटी 9 लाख 82 हजार 278 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  गत पाच महिन्याच्या कालावधीत दारूबंदी कायद्याअंतर्गत 1 हजार 361 गुन्हे, जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत 349 गुन्हे, प्रतिबंधित गुटखा विक्री व्यवसाय अंतर्गत 36 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी स्वतःचा खाजगी मोबाईल क्रमांक जाहीर केला. या मोबाईल क्रमांकावर अवैध धंद्याची माहिती देणार्‍या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाते. मिळालेल्या महितीनंतर तातडीने छापा मारला जातो.  वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होऊ न देता वाहतूक सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, त्यावरही तोडगा काढत पोलीस अधीक्षकांनी वाहन चालकांमध्ये वाहतूक जनजागृती केली. वाहतूक शाखेच्या वतीने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या 53 हजार 971 वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करत 1 कोटी 21 लाख 10 हजार 690 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

COMMENTS