Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिव्हाळा बेघर निवारा केन्द्रात अन्नदान करून बीबी वैद्य यांचा वाढदिवस साजरा

बीड प्रतिनिधी - काल दि. 12/07/23 रोजी जिव्हाळा बेघर निवारा केन्द्रामधे  बीबी वैद्य यांचा  वाढदिवस साजरा करण्यात आला.या जिव्हाळा परिवारातिल् अनाथ

निर्यातबंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले ?
खासगी रुग्णालयांकडील लस साठयात होणार कपात l DAINIK LOKMNTHAN
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ | LOKNews24

बीड प्रतिनिधी – काल दि. 12/07/23 रोजी जिव्हाळा बेघर निवारा केन्द्रामधे  बीबी वैद्य यांचा  वाढदिवस साजरा करण्यात आला.या जिव्हाळा परिवारातिल् अनाथ, बेघर, निराश्रित, मनोरुग्ण, निराधार  यांना  अन्नदान  करण्यात आले. यामध्ये वरण,भात,गोबीची भाजी, चपाती,जिलेबी आणी केक वाटप करण्यात आले. या निमित्ताने येथील लोकांनी बीबी वैद्य यांना सर्वांच्या कडून वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत शुभेच्छा, आणि खुप खुप आशिर्वाद. या कार्यक्रमात बीबी  वैद्य, संपादक वैभव स्वामी,बाबासाहेब थोरात, सय्यद मुमताज , राजेश सोनवणे केज,अशोक शेळके,फिरदोस खान,  अनिकेत्  डोळसे, सविता जैन, सुरेखा जाधव,संजीवनी खोगरे,अशा दाणी, सविता दोडके, आशा आमटे , कोकाटे बंधू  तसेच निवारा केन्द्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात बीबी वैद्य यांनी सांगितले की,सर्व प्रथम पांगरी येथील माझ्या कुंभार समाज भगिनी यांनी औक्षण केले, समाज बांधवानी सत्कार केला. आम्ही बीड शहरातील   जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मी व माझ्या मित्रांचा वाढदिवस या निवारा बेघर केंद्रात अन्नदान करून साजरा  करतो.यामुळे मी दोन अपघाता तुन वाचलोआहे.त्यामुळे  12 जुले मध्ये माझा वाढदिवस पुन्हा साजरा करण्यात आला.येथील अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब थोरात यांनी केले होते. ईश्वर भारती अकॅडमी, याठिकाणी अशोक शेळके सर ,आयडियल कोचिंग क्लासेस धानोरा रोड,बीड, एस.पी.कार्यालयात डी. वाय. एस.पी.संतोष वाळके साहेब ,समाजिक न्याय भवन येथे संघर्ष भैया वडमारे यांनी बीबी वैद्य यांचा वाढदिवस साजरा करून पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमचे सूत्रसंचन अभिजित वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन  बीबी वैद्य यांनी मानले.

COMMENTS