Homeताज्या बातम्याविदेश

पॅरासिलिंग करताना हवेतच अचानक एकमेकांत अडकले दोर

अनेकांना अडवेंचर स्पोर्ट्स इतके आवडतात की ते हे सगळं करण्यासाठी दुसऱ्या शहरांत किंवा इतर देशांतही जातात. विमानातून उडी मारणं किंवा पॅराशूटच्या सा

व्यवस्थेला प्रश्न विचारणारी विवेकी पिढी घडली पाहिजे – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
अल अमीन उर्दू हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट 

अनेकांना अडवेंचर स्पोर्ट्स इतके आवडतात की ते हे सगळं करण्यासाठी दुसऱ्या शहरांत किंवा इतर देशांतही जातात. विमानातून उडी मारणं किंवा पॅराशूटच्या साह्याने उंच टेकडीवरून उडी मारणं, हे सर्व खेळ अतिशय धोकादायक आहेत. या खेळांमध्ये अनेकवेळा अशा घटना घडतात ज्यामुळे जीव गमवावा लागतो. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असंच काहीसं दृश्य पाहायला मिळतं. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खूप उंचीवरून पॅराशूटद्वारे खाली येताना दिसतो पण अचानक त्याचं पॅराशूट अडकतं. @Enezator या ट्विटर अकाउंटवर अनेकदा धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पॅराशूटवरून खाली पडताना दिसत आहे. तो पॅराशूटसोबत तो हळूहळू खाली येत नाहीये, तर सरळ खाली पडत आहे. याचं कारण म्हणजे त्याच्या पॅराशूटचे दोर एकमेकांत अडकले आहेत, त्यामुळे तो वेगाने खाली पडताना दिसतो. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याचं पॅराशूट पूर्णपणे उघडत नसल्याने तो वेगाने खाली येत आहे. व्हिडिओच्या पुढच्या भागात, तो पॅराशूट उघडण्यासाठी कसा धडपडत आहे हे क्लोज कॅमेरा दाखवत आहे. पण खाली जात असताना अचानक काहीतरी चमत्कार घडतो आणि त्याचं पॅराशूट उघडतं. एकतर तो एक अतिशय प्रशिक्षित व्यक्ती आहे, ज्याला पॅराशूटसोबत कलाबाजी करणं जमतं किंवा तो भाग्यवान आहे की या घटनेत तो जगला आणि जखमी न होता जमिनीवर आला.व्हायरल व्हिडिओला 38 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की त्याला आयुष्य खूप आवडतं, यामुळे तो कधीही स्कायडायव्हिंगला जाणार नाही. एकाने म्हटलं, की हा मरणाचा मार्ग आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटलं की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव केविन फिलिप आहे आणि ही घटना त्याच्यासोबत ऑगस्ट 2022 मध्ये घडली होती.

COMMENTS