अग्नीपाडा येथून दीड कोटीचे कोकेने जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अग्नीपाडा येथून दीड कोटीचे कोकेने जप्त

अमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटने मध्यरात्री आग्रीपाडा येथील लाल मैदानाजवळ 500 ग्रॅम

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला ; हल्लेखोरांची ओळख पटली
लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा जिल्ह्यात दाखल : जिल्हाधिकारी

मुंबई / प्रतिनिधीः अमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटने मध्यरात्री आग्रीपाडा येथील लाल मैदानाजवळ 500 ग्रॅम वजनाच्या कोकेनची तस्करी करणार्‍या परदेशी व्यक्तीला अटक केली आहे. या कोकेनची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्को (वय 35) असे या आरोपीचे नाव आहे. 

अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलिस निरीक्षक मसवेकर यांना त्यांच्या विश्‍वासू बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर घटनास्थळी सापळा रचण्यात आला. आरोपी चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्को हा सापडला. त्यानंतर त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण पाचशे ग्रॅम वजनाचा ’कोकेन’ हा अमली पदार्थ मिळून आला. हा आरोपी मूळचा नायजेरियाचा असून तो सध्या नवी मुंबईतील जुईनगर येथे राहतो. तो तेथे कपड्याचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांना त्याने तपासात सांगितले. हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता आहे. त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे.

COMMENTS