महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन ; सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असलेले दहापैकी नऊ जिल्हे महाराष्ट्राचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन ; सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असलेले दहापैकी नऊ जिल्हे महाराष्ट्राचे

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.

आईकडून झालेल्या मारहाणीत साडेतीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
आता आपल्या श्‍वासाची तरी कुणी द्यावी हमी…
महिलेवर अत्याचार.. माजी पोलिस निरीक्षकांच्या मुसक्या आवळल्या l पहा LokNews24

नवी दिल्लीः देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणार्‍या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 

दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे, जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 28 हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे. असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या वेळी सांगितले. याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला 1700, तर मध्य प्रदेशात 1500 रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सुरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदूर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणार्‍या 10 जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोल्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवीन प्रकार आढळून आले आहेत. महाराष्ट्रात ए484ट आणि एल 45 दोन आर हे दोन कोरोनाचे प्रकार आढळले आहेत. महाराष्ट्रातील 15 ते 20 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे हे नवीन प्रकार आढळले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात पुन्हा वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येत्या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून राज्यांना त्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.  आता सणांचा काळात केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अ‍ॅलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. होळी, ईद, शब-ए-बारात आणि ईस्टरला होणारी गर्दी रोखण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. केरळमध्येही कोरोनाचा नवीन प्रकार आढळला आहे.

COMMENTS