शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टयांचा संभ्रम दूर करावा -बाबासाहेब बोडखे

Homeशहरंअहमदनगर

शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टयांचा संभ्रम दूर करावा -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत म

शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेत; प्रांताधिकारी नितीन पाटील; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा गौरव
वांबोरीतील जनता दरबारात दिव्यांग महिलेला ना.तनपुरे यांनी दिले स्वतः रेशनकार्ड

अहमदनगर (प्रतिनिधी)-

राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविले आहे. सध्या राज्यात निर्माण झालेला दिवाळी सुट्टयांचा संभ्रम तातडीने दूर होणे अपेक्षित असून, यासाठी शिक्षक परिषद पाठपुरावा करीत असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण (एनएएस) साठी शाळांची निवड स्थानिक पातळीवर झाली आहे. राज्यातील सर्वच शाळांमध्ये सदर सर्व्हेक्षण होणार नसून, ज्या शाळांमध्ये सर्व्हेक्षण होणार नाही त्या शाळांची दिवाळी सुट्टी कायम ठेवण्यात यावी. शाळांना 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान ज्या शाळेत एनएएस परीक्षा नाही, त्या शाळेत मुलेही येतील असे वाटत नाही. ज्या शाळांनी दोन दिवसीय सर्व्हेक्षण पुर्ण केले. अशा शाळांना सर्व्हेक्षणानंतर दिवाळीची सुट्टी मिळणे अपेक्षित आहे. कोरोना काळात इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू आहेत. शाळेत कोरोनाचे संकट कायम असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत मिळण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS