नवरात्रोत्सवात भाविकांना ई पास उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम

Homeअहमदनगर

नवरात्रोत्सवात भाविकांना ई पास उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम

पाथर्डी (प्रतिनिधी ) अभिजीत खंडागळे नवरात्रोत्सवात भाविकांना मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी ॲड.प्रतीक खेडकर मित्र मंडळाच्या वतीने ई पास उपलब्ध करून

नगरसेविका वंदना टेकेंच्या अपात्रतेची सुनावणी २० तारखेला
अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा : आ. मोनिका राजळे

पाथर्डी (प्रतिनिधी ) अभिजीत खंडागळे

नवरात्रोत्सवात भाविकांना मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी ॲड.प्रतीक खेडकर मित्र मंडळाच्या वतीने ई पास उपलब्ध करून देण्याचा कौतुकास्पद उप्रकम राबवत असून यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नवरात्र उत्सवात मोहटा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना ई पास काढणे अनिवार्य केल्यामुळे व रोज पाच हजार भाविकांनाच  ई पास मिळणार असल्याने. ॲड. प्रतिक  खेडकर व जगदंब युवा प्रतिष्ठान च्या वतीने भाविकांसाठी ई पास काढून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यावेळी  प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे ,भैया गांधी,पांडुरंग हंडाळ ,हे होते तर सौरभ खरमाटे ,पवन दहिफळे, अजय विघ्ने , यश आरोळे, वैभव गाडे , अभिषेक शेळगावकर , पवन बोरुडे , प्रसाद देशमुख  ,वैभव केदार ,अमोल पवार , साकिब पठाण , प्रतीक धरणकर , अविष्कार चिंतामणी , नितीन पवार , महिंद्र आरगडे , आदी जण उपस्थित होते .

     मोहटादेवीला जाणारे महिला भक्त जास्त प्रमाणात असतात.ग्रामीण भागातील भाविक मोठ्या प्रमाणावर नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी येतात.मात्र त्यांना ई पास बद्दल माहिती नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती.अनेक भाविकांकडे पास नसल्यामुळे मोहटादेवी गडाच्या पायथ्या वरून दर्शन न घेताच परत यावे लागे. मात्र भाविकांची गरज ओळखून जगदंब युवा प्रतिष्ठान च्या मार्फत भाविकांना ई पास उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची देवीच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे. ॲड. प्रतिक खेडकर यांचे उपक्रम लोकहिताचे असतात.तत्पर सेवा,उत्कृष्ट नियोजन व सामाजिक कामाची वृत्ती यामुळे त्यांना नागरिकाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.मागील आठवड्यात सर्व रोग निदान शिबिरासाठी खेडकर यांनी रुग्णांना मोफत वाहनांची सोय केली होती.वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवण्यात ॲड.प्रतीक खेडकर व जगदंब युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य अग्रेसर असतात.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.प्रतिक खेडकर यांनी केले तर प्रसाद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS