टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान

Homeशहरंअहमदनगर

टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान

कर्जत : प्रतिनिधी टेलर दुकानाला आग लागून शिवण्यासाठी आलेली कपडे, शिलाई मशिन व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे

ऍड. गवारे ‘एनआयए’च्या ‘स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटर’पदी 
कर्जतमधील पर्यावरण संवर्धनाची वनरक्षक प्रशिक्षणार्थींकडून पाहणी
संस्कृतीमध्ये भाषा व कलांचा मोठा वाटा : हांडे

कर्जत : प्रतिनिधी

टेलर दुकानाला आग लागून शिवण्यासाठी आलेली कपडे, शिलाई मशिन व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे घडली आहे. जगदंबा मंदिरालगतच्या फेमस टेलर या दुकानाला मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

संदीप बोबडे यांच्या मालकीच्या दुकानाला भीषण आग लागल्याने सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत शिलाई मशीन, इन्व्हर्टर, टेबल, साड्या व इतर कपडे जळून खाक झाले. तलाठ्याने नुकसानीचा पंचनामा केला आहे.

COMMENTS