Homeताज्या बातम्या

अनिलदादा जगताप यांच्या निवासस्थानी महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांची सदिच्छा भेट; राजकीय हालचालींना वेग

बीड : धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांनी बुधवार, दि. 11 जून 2026 रोजी

रिपाइं कार्यालयात बसवराज पाटील यांची सदिच्छा भेट आणि सत्कार
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्‍यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले
विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले


बीड : धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांनी बुधवार, दि. 11 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या वेळी आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचे स्वागत अनिलदादा जगताप यांच्या परिवाराच्या वतीने विजय जगताप यांनी केले. तसेच बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर, सभापती संजय उडान, नगरसेविका शीतलताई चक्रे, नगरसेवक सुरज चुंगडे यांनीही त्यांचे स्वागत व सत्कार केला. या भेटीदरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली. बीडमधील शिवसेना पदाधिकारी व मतदार महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी बीड विधानसभा प्रमुख सुनिलभाऊ अनभुले, जिल्हा संघटक सुनिल सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक काळे, तालुका प्रमुख संतोष जाधव, शहर प्रमुख गजानन कदम, उपजिल्हाप्रमुख अजय जाधव, अमोल जाधव, ज्ञानेश्वर माऊली खांडे, जिल्हा सहसमन्वयक सुनिल गवते तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे आगामी निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

COMMENTS