वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप

Homeफीचर

वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)-  कोरोनाच्या संकटकाळात गरजू गोर-गरीब घटकांना आधार देण्यासाठी उभे राहिलेल्या घर घर लंगर सेवेने शहरातील वंचितांची दिवाळी गोड केल

अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
मागासवर्गीय ग्रामस्थांची समशान भूमीची जागा हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी – अशोक गायकवाड
विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

कोरोनाच्या संकटकाळात गरजू गोर-गरीब घटकांना आधार देण्यासाठी उभे राहिलेल्या घर घर लंगर सेवेने शहरातील वंचितांची दिवाळी गोड केली. थंडीत रस्त्याच्या कडेला कुडकुडणार्‍या वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप घर घर लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले. मध्यरात्री मिळालेली अनोखी दिवाळी भेट पाहून अनेक गरजूंच्या चेहर्‍यावर आनंद फुलले.

शहरातील अशोका हॉटेल येथून मंगळवारी (दि.2 नोव्हेंबर) रात्री कडाक्याच्या थंडीत गरजूंसाठी ब्लँकेट, कपडे व फराळ घेऊन घर घर लंगर सेवेच्या सेवादारांचा वाहनांचा ताफा रेल्वे स्टेशन व शहरातील सर्व बस स्थानकवर दाखल झाला. गरजू घटकांचा शोध घेऊन गरजेप्रमाणे त्यांना ब्लँकेट, कपडेसह फराळचे वाटप करण्यात आले. रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम करणार्‍या कामगारांना देखील ही दिवाळी भेट देण्यात आली. जिल्हा रुग्णालय व रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरजू घटकांना ही अनोखी भेट लंगर सेवेने दिली. तर मदत घेऊन आलेल्या सेवादारांनी गरीब-श्रीमंतीच्या दरीचा अंधकार दूर होण्याचा संदेश देत पणत्या प्रज्वलीत केले.

पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी या उपक्रमात सहभागी होऊन गरजूंना दिवाळी भेट दिली. यावेळी लंगर सेवेचे हरजीतसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, राजा नारंग, मनोज मदान, सुनील छाजेड, कैलाश नवलाणी, करण धुप्पड, सुनील थोरात उपस्थित होते. अहमदनगर पोलीस दल व लायन्स क्लबच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी लंगर सेवेच्या सेवादारांचे हात सरसावले होते.

COMMENTS