Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक भरतीसाठी तरुणाचे मंत्रालयात आंदोलन

मुंबई/प्रतिनिधी ः शिक्षक भरती करावी या मागणीसाठी एका तरुणाने मुंबईतल्या मंत्रालयामध्ये आंदोलन केले. या तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड

आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी
अरूणकुमार मुदंडा यांची पत्रकारिता विधायक आणि कल्याणकारी

मुंबई/प्रतिनिधी ः शिक्षक भरती करावी या मागणीसाठी एका तरुणाने मुंबईतल्या मंत्रालयामध्ये आंदोलन केले. या तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. यावेळी या तरुणाने जोरदार घोषणाबाजी देखील केल्या. पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उडी मारून या तरूणाला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक भरती करावी या मागणीसाठी बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने मंत्रालयात मंगळवारी आंदोलन केले. लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी अशी मागणी या तरुणाने केली आहे. हा तरुण उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याने असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS