Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात टायरच्या स्फोटात तरूणाचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहराजवळ बुधवारी सकाळी एक अतिशय दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बायपास रोडवर उभ्या असलेल्या ट्र

भामट्या अशोक खरातच्या अत्यंत विश्वासू सहकारी जितेंद्र शेळके यांचा संशयास्पद मृत्यू; SIT मागणीने खळबळ
इथे आत्मे फिरतात आणि विकास रोखतात छ.संभाजीनगर महानगरपालिकेच्या इमारतीबाबत मंत्री शिरसाट यांचे विधान
गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहराजवळ बुधवारी सकाळी एक अतिशय दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बायपास रोडवर उभ्या असलेल्या ट्रकच्या टायरची हवा तपासत असताना अचानक टायरचा भीषण स्फोट झाला आणि त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. 37 वर्षीय सानेश्‍वर दिलीप मिस्तरी असे मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. त्यांनी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक घेऊन गुजरातहून आणला होता. ट्रक रिकामा करण्यापूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे टायरची तपासणी सुरू केली होती. मात्र, याच वेळी अचानक टायरचा जोरदार स्फोट झाला.

COMMENTS